26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRajapurशाळकरी मुलांच्या घोषणांनी बारसू सडा पुन्हा दणाणला - रिफायनरी हटवा, कोकण वाचवा

शाळकरी मुलांच्या घोषणांनी बारसू सडा पुन्हा दणाणला – रिफायनरी हटवा, कोकण वाचवा

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बारसू सोलगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी बारसू सड्यावर रिफायनरी माती परीक्षण करताना बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी आणि प्रशासनाच्या अन्य मंडळींनी केलेल्या कचऱ्याची साफसफाई करत अनोख्या पद्धतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी ‘एकच जिद्द रिफायनरी रद्द, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, रिफायनरी हटवा कोकण वाचवा’ अशा घोषणांनी पुन्हा एकदा बारसू सडा दणाणला. प्रशासनाने बारसू सड्यावर केलेला कचरा एकत्र करुन राजापूर नगर परिषदकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या अनोख्या आंदोलनाने जिल्हा प्रशासनाला चपराक बसली असल्याची चर्चा सुरू आहे. माती परीक्षण राजापूर तालुक्यातील बारसू -सोलगाव पंचक्रोशीत प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प करण्यासाठी प्रशासनाने स्थानिक जनतेचा विरोध झुगारून माती परीक्षण काम प्रचंड पोलीस बंदोबस्तात २२ एप्रिल ते ११ मे या कालावधीत पूर्ण केले. बारसू सड्यावर माती परीक्षण करण्यासाठी संरक्षणासाठी आलेल्या प्रशासनाच्या मंडळींकडून प्लास्टिकच्या बाटल्या वापरून सड्यावरच फेकून देण्यात आल्या होत्या. प्लास्टीकचा मोठा ढिग या ठिकाणी साचला होता. माती परीक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर बारसू सड्यावर झालेल्या कचऱ्याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले असा स्थानिकांचा आरोप आहे.

बारसू सड्यावर प्लास्टिकचा खच – बारसू सड्यावर बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना रत्नागिरी येथून पाकिटबंद जेवण आणि प्लास्टिक बाटल्यातून पाणीपुरवठा करण्यात आला होता. सुमारे १५ दिवस चाललेल्या माती परीक्षण वेळी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी वापरलेल्या प्लास्टिक बाटल्या मोठ्या प्रमाणात तेथेच टाकून देण्यात आल्या होत्या. हजारो बाटल्यांचा खच बारसू सड्यावर पडला होता.

पर्यावरण दिनाचे औचित्य – रिफायनरी प्रकल्प माती परीक्षण मात्र, बारसू सोलगाव प्रस्तावित काम सुरू असताना बारसू सड्यावर पडलेल्या प्लास्टिक बाटल्यांमुळे चरणाऱ्या गुरांसह अन्य प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. जनतेत पर्यावरणाविषयी जागृती व्हावी याकरिता विविध स्तरावर जागतिक पर्यावरण दिन ५ जून रोजी साजरा’ करण्यात येतो. बारसू -सोलगाव पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बारसू सड्याची साफसफाई करण्याचा निर्धार केला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बारसू सड्यावर पडलेल्या प्लास्टिक बाटल्या एकत्र करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.

RELATED ARTICLES

Most Popular