26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeRatnagiriटिके बोगद्यात धुरामुळे मंगला एक्स्प्रेस थांबली

टिके बोगद्यात धुरामुळे मंगला एक्स्प्रेस थांबली

कोकण रेल्वे मार्गावरील पोमेंडी निवसर ही ठिकाणे अतिसंवेदनशील म्हणून ओळखली जातात. पावसाळ्यात तर या मार्गावर २४ तास कोकण रेल्वेकडून गस्त घातली जाते. मात्र सोमवारी घडलेल्या प्रकारामुळे सारी कोकण रेल्वेची यंत्रणा क्षणात कामाला. लागली.

बोगद्यानजीक आग – कोकण रेल्वे मार्गावरील टिके येथील एका बोगद्यानजीक कोणी तरी पालापाचोळा पेटवला होता. त्याचा धूर वाऱ्याने बोगद्यात शिरला होता. त्याच दरम्यान या मार्गावरून धावणारी मंगला एक्सप्रेस टिके येथील बोगद्यात आली आणि क्षणार्धात स्मोक डिटेक्टर वाजू लागला.

गाडी जागच्या जागी थांबली – मंगला एक्सप्रेसमधील स्मोक डिटेक्टर ही अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर सायरन वाजू लागला. सायरन वाजताच लोकोपायलटने काही तरी घटना घडलीय हे लक्षात घेऊन मंगला एक्सप्रेस जागच्या जागी थांबवली.

कोरेचे सेफ्टी पथक धावले – टिके बोगद्यातील माहिती मिळताच कोकण रेल्वेची सारी यंत्रणा धावाधाव करू लागली. रिजनल मॅनेजर यांच्यासह सेफ्टी ऑफिसर घटनास्थळाकडे रवाना झाले. टिकेतील बोगद्याजवळ येताच त्यांना बोगद्याबाहेर जाळलेला पालापाचोळा दिसला.

यंत्रणा अलर्ट – कोकण रेल्वे मार्ग हा काही. ठिकाणी अतिसंवेदनशील ठिकाणांचा आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी या मार्गावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. सोमवारी घडलेल्या प्रकारामुळे कोकण रेल्वे यंत्रणा किती अलर्ट आहे याचा प्रत्ययं साऱ्यांनाच पहायला मिळाला.

धुरामुळे सायरन वाजला – कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये स्मोक डिटेक्टर यंत्रणा बसवण्यात आली आहे. टिके बोगद्यात मंगला एक्सप्रेसने प्रवेश केल्यानंतर स्मोक डिटेक्टर धुरामुळे लगेच कार्यान्वित झाला आणि त्यामुळे सायरन वाजू लागला.

प्रवाशांची भंबेरी उडाली – बोगद्यात अचानक ट्रेन थांबल्याने नेमकं काय घडलं याची कल्पना कोणालाच आली नव्हती. मात्र आगीमुळे सायरन वाजल्याचे लक्षात येताच प्रवाशांची चांगलीच भंबेरी उडाली. अनेकजण गाडीतून खाली उतरले होते. मात्र कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली होती. धुरामुळे सायरन वाजल्याचे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना सांगितल्याने साऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

गाडी मार्गस्थ – टिके बोगद्यात थांबलेल्या मंगला एक्सप्रेसची पाहणी केल्यानंतर ही गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे रवाना करण्यात आली. या प्रकारामुळे कोकण रेल्वेची टीम इतकी अलर्ट आहे याचे प्रात्यक्षिकच साऱ्यांना पहायला मिळाले.

RELATED ARTICLES

Most Popular