29.4 C
Ratnagiri
Sunday, June 1, 2025

जिल्ह्यातील २५८ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

या सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर आस्थापना...

काम वेळेत न करणाऱ्यांचा ठेका रद्द करा – खासदार नारायण राणे

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गांभीर्याने आणि वेळेत पूर्ण...

रत्नागिरीचा विकास पर्यटकांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री उदय सामंत

सामंत म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांच्यामुळे कोकणातच पत्रकारिता...
HomeRatnagiriरत्नागिरी रेल्वे स्टेशन आवारात गांजा जप्त

रत्नागिरी रेल्वे स्टेशन आवारात गांजा जप्त

रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. फैजल मकसूद मस्कर, वय वर्षे २८ असे या संशयिताचे नाव आहे.

२५ जून ची ही घटना आहे. कर्ला येथील हा संशयित रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या आवारात मोटर सायकल पार्किंग मध्ये उभा होता, त्याच्या हातामध्ये एक पिशवी होती आणि संशयित रित्या तो आवारामध्ये फिरत होता. त्याच्या हालचालींवरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस गस्त घालत असताना फैजल याला पकडले अधिक विचारपूस आणि पिशवीची तपासणी केली असता पोलिसांना त्याच्याजवळ ७५ ग्रॅमचा गांजा हा अमली पदार्थ सापडून आला.

सदर अमली पदार्थ गांजा हा जवळ बाळगणे किंवा तो विकणे हा फौजदारी गुन्हा आहे. फैजल जवळ सापडलेल्या ७५ ग्रॅमचा १८७५ रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन डोमणे यांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular