23.9 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeRatnagiriकोविड ड्युटी कालावधी कमी करण्याची शिक्षिकांची मागणी

कोविड ड्युटी कालावधी कमी करण्याची शिक्षिकांची मागणी

रत्नागिरीमध्ये कोविडच्या प्रादुर्भावामुळे शाळा अजून प्रत्यक्ष सुरु झाल्या नाही आहेत, परंतु, ऑनलाईन शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षण सुरु आहे. कोविडच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भार देण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना सलग १ महिना ड्युटी लावण्यात आली आहे. या आदेशाची महिला शिक्षिकानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

१५ जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले असल्याने, कोरोनामुळे शाळेचे शिक्षकांचे शिकविण्याचे कामकाज ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरु आहे. जिल्ह्यातील आणि तालुक्यातील अनेक प्राथमिक महिला शिक्षिका आणि शिक्षक यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सलग एक महिना ड्युटी लावली तर, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अभ्यासाचा गोंधळ उडणार आहे.

रत्नागिरी गटशिक्षण अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांनी प्राथमिक शिक्षकांना लावलेल्या सलग ड्युटीमुळे शिक्षक आणि विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहत आहेत, पालकांनी सुद्धा ऑनलाईन शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले असल्याने रोज शिक्षकांना पुढील अभ्यासक्रम आणि रोजच्या गृहपाठाची मागणी केली जात आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थीसुद्धा अभ्यासात आलेल्या अडचणी सुद्धा शिक्षकांकडून समजावून घेवू लागले आहेत. पण या सलग लावण्यात आलेल्या कोरोना ड्युटीमुळे सगळ्या गोष्ठी एकत्रितरीत्या घडवून आणणे कठीण बनले आहे, त्यामुळे शिक्षक वर्गाची मोठ्या प्रमाणातील नाराजी समोर आली आहे.

जिल्हा आणि तालुक्यातील महिला शिक्षिकांनी वरील अधिकारी वर्गाकडे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सलग एक महिना ड्युटी न लावता, सदर कालावधी कमी करण्यात येऊन तो दहा ते पंधरा दिवसांचा करण्यात यावा अशी मागणी केली आहे. कालावधी कमी केल्याने शैक्षणिक अभ्यास आणि कोविड ड्युटी दोन्ही सुद्धा व्यवस्थितपणे सांभाळता येईल.

RELATED ARTICLES

Most Popular