25.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeDapoliदापोलीत समुद्रकिनारी आणखी चरस सापडल्याने खळबळ

दापोलीत समुद्रकिनारी आणखी चरस सापडल्याने खळबळ

१४ ऑगस्ट रोजी कर्दे बीचवर ११.३८ केजी चरस जप्त झाला.

दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी चरसची पाकिटे सापडल्यानंतर या भागात पोलिसांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली असून या शोध मोहिमेत गुरुवारी (१७ ऑगस्ट) मुरूड येथे आणखी ८ अफगाणी चरसची पाकिटे सापडली आहेत तर शुक्रवारी आघारी येथे चरस असलेली आणखी ४ पाकिटे आढळली आहेत. सलग चार दिवस दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर चरसची पाकिटे आढळून येत असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारतीय सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार १४ ऑगस्ट रोजी कर्दे बीचवर ११.३८ केजी चरस जप्त झाला. १५ ऑगस्ट रोजी कर्दे ते लाडघर बीचदरम्यान ३४.९१ केजी, १६ ऑगस्ट रोजी केळशी बीचवर २४.९९ केजी, १६ ऑगस्ट रोजी कोळथरे बीचवर १३.४ केजी, १७ ऑगस्ट रोजी मुरूड बीचवर १४.४१ केजी, १७ ऑगस्ट रोजी बुरोंडी ते दाभोळ दरम्यान १००.९५ केजी आणि १७ ऑगस्ट रोजी बोऱ्या येथे २१.८५ केजी असा एकूण २२२.३९ केजी चरस जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरूड समद्रकिनाऱ्यावरील केतकीच्या बनात सोमवारी (१४ ऑगस्ट) चरसची १२ पाकिटे सापडली होती. ही पाकिटे गुजरात येथे पकडण्यात आलेल्या. चरसच्या पाकिटांशी मिळती जुळती असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर बुधवारी (१६ ऑगस्ट) हर्णे नवानगर येथे समुद्रकिनारी ८ पाकिटे सापडली होती. ही पाकिटे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यानंतर दापोली हर्णे दूरक्षेत्राचे सहायक उपनिरीक्षक बी. डी. पवार, हर्णे दूरक्षेत्राचे दिलीप नवले यांनी हर्णे ते मुरूड दरम्यान शोध मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

हर्णे, नवानगर, मुरुड, कर्दे या दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मुरूड किनारी पुन्हा ८ चरसची पाकिटे सापडली आहेत. त्याचा पंचनामा करून ती जप्त करण्यात आली आहेत. पुढील काही दिवस ही मोहीम सुरूच ठेवणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड समुद्रकिनारी शोध मोहीम राबवली जात आहे. समुद्रकिनारी कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळून आल्यास पोलिसांना खबर देण्याचे आवाहन दापोली पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular