29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

आंबा घाटात ३ बोगद्यांसाठी सर्वेक्षण…

मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाने गती घेतली...

दापोलीतील सुवर्णदुर्ग वारसास्थळात शिवरायांच्या किल्ल्यांना जगाचा मुजरा

आक्रमकांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मराठी रयतेला आणि मनांना...

बसरा स्टार जहाज पाच वर्षांनंतर भंगारात, दोन कोटींत व्यवहार

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर...
HomeRajapurराजापुरात डेंग्युची साथ पसरतेय १३१ घरांमध्ये सापडल्या अळ्या

राजापुरात डेंग्युची साथ पसरतेय १३१ घरांमध्ये सापडल्या अळ्या

तालुक्यातील १८ हजार ७६७ घरांमध्ये केलेल्या तपासणीमध्ये १३१ घरांमध्ये डेंग्युच्या अळ्या सापडल्या.

तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरामध्ये तापसरी व डोळ्यांचा आजार वेगाने फैलावत असताना आता डेंग्युची साथही सुरू झाली आहे. तालुक्यातील १८ हजार ७६७ घरांमध्ये केलेल्या तपासणीमध्ये १३१ घरांमध्ये डेंग्युच्या अळ्या सापडल्या असून त्या निकामी करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्याचवेळी डेंग्युच्या आजाराची लागण झालेला एक रूग्णही सापडला असून उपचाराअंती त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचेही तालुका आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. डेंग्युच्या साथीला रोखण्यासाठी शहरामध्ये नगर परिषदेतर्फे धूर फवारणी मोहिम राबवण्यात येत आहे.

तर शहरासह ग्रामीण भागामध्ये आरोग्य विभागातर्फे कंटेनर सर्व्हेक्षण मोहिम हाती घेण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान साथीच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या गावोगावच्या पथकांमार्फत सुमारे १८ हजार ७६७ घरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १३१ घरांमध्ये डेंग्युच्या अळ्या सापडल्या असून त्या निकामी करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान डेंग्यु साथीला अटकाव करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागातर्फे योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये आरोग्य पथकांमार्फत सर्व्हेक्षण व जनप्रबोधन करताना अळ्यांचा नाश करण्याच्या उपाययोजना केल्या जात आहेत. लोकांनीही स्वतः घर व परिसरामध्ये स्वच्छता ठेऊन डेंग्युचा फैलाव होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान डेंग्युच्या साथीच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासनही कमालीचे सतर्क झाले आहे. नगरपालिकतर्फे शहरामध्ये धूर फवारणीची मोहिम हाती घेण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular