26.8 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeChiplunइतक्या खालच्या पातळीवर मी लक्ष देत नाही - पालकमंत्री उदय सामंत

इतक्या खालच्या पातळीवर मी लक्ष देत नाही – पालकमंत्री उदय सामंत

शहरातील बहादूरशेखनाका येथे स्वामी मंगल कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद झाली.

आमदार भास्कर जाधव यांचे काय सांगू? ते बारामतीमधून देखील निवडणूक लढवतील. मी राज्याचा नेता आहे. इतक्या खालच्या पातळीवर मी लक्ष देत नाही. भाषण काय मीही करतो, त्यामुळे बोलायला काय जाते? प्रत्यक्षात जनता ठरवते, कोणाला विजयी करायचे ते. लोकशाहीत ज्यांच्या नशिबात असते तोच विजयी होतो, अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या भाषणाचा समाचार घेतला. शहरातील बहादूरशेखनाका येथे स्वामी मंगल कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद झाली. या वेळी शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘आता अजित पवार राष्ट्रवादी गट सत्तेत सहभागी झाला आहे.

आमच्याबरोबर भाजप, राष्ट्रवादी गट, आरपीआय आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्यादृष्टीने जागा वाटपाबाबत आमचे तीन नेते एकत्र बसतील व निर्णय घेतील. तो सर्वांना मान्य असेल. आमच्या नेत्यांना महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीची माहिती आहे. त्या त्या ठिकाणची ताकद आणि स्थिती याची नेत्यांना पूर्ण कल्पना आहे.’ आमदार जाधव यांच्या वक्तव्यांवर ते म्हणाले, ‘ते कुठून निवडणूक लढवतील हे तेच ठरवतील. आपल्याला त्यात स्वारस्य नाही. मी राज्याचा नेता आहे. इतक्या खालच्या पातळीवर मी लक्ष देत नाही. आमदार जाधवांनी बारामती, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी कोठूनही निवडणूक लढवावी, त्यांचा तो अधिकार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular