27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeRatnagiriपूर्णगड परिसराची श्वान पथकाद्वारे तपासणी - अंमली पदार्थ विरोधी

पूर्णगड परिसराची श्वान पथकाद्वारे तपासणी – अंमली पदार्थ विरोधी

पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किनाऱ्यावरही शोध मोहीम घेण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थविरोधी मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. गुहागर व दापोली किनाऱ्यावर चरसची पाकिटे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन दिवस ३५ जणांचे एक पथक डॉग स्कॉडसह तपासणी करत होते. या तपासणीत कोणतीही वस्तू न सापडल्याने किनाऱ्यावरील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. गेल्या आठवड्यात गुहागर व दापोली समुद्रकिनाऱ्यावर चरसची पाकिटे सापडली. ही पाकिटे गुजरातमधून आली असण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यासाठी दापोली किनाऱ्यावर पोलिस, कस्टम विभागाने शोध मोहीम राबवली होती.  या पार्श्वभूमीवर पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किनाऱ्यावरही शोध मोहीम घेण्यात आली.

यासाठी डॉग स्कॉडसह ३५ जणांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने समुद्रकिनारा हद्दीतील वायंगणी, फिनोलेक्स जेटी परिसर, रनपार, गणेशगुळे, मेर्वी, पूर्णगड, गावखडी गावडे आंबेरे, डोलें आदी भागांमध्ये शोध मोहीम राबविण्यात आली. परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नसल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात गणेशगुळे पोलिसपाटील संतोष लाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही समुद्रकिनारी गस्त घालण्याच्या दृष्टीने फिरत असतो. काही वेगळे सापडल्यास त्यासंदर्भात पोलिसांना तातडीने कळवतो. किनाऱ्यावरील नागरिकांना त्रास होऊ नये यादृष्टीने आम्ही सतर्क राहतो व दुसऱ्यांना जागते रहो असे सांगत असतो.

RELATED ARTICLES

Most Popular