21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriकोकणातील राजकीय समीकरणे बदलणार - मंत्री नारायण राणे

कोकणातील राजकीय समीकरणे बदलणार – मंत्री नारायण राणे

ही निवडणूक म्हणजे एकप्रकारे विधानसभेपूर्वीची तालिम आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी फक्त सिंधुदुर्गातील आघाडीच्या बळावर बाजी मारल्यानंतर कोकणचे नेते म्हणून पुन्हा एकदा त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. जी रणनीती त्यांनी वापरली त्याचा विचार करता भविष्यातील विधानसभेसह पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर एकहाती अधिराज्य राहण्यासाठी ते आक्रमक राहतील असे चित्र आहे. भाजपसाठी हा अनपेक्षित फायदा आहे. राणेंच्या विजयामुळे रत्नागिरीसह इतरत्र अनेकांची सत्तास्थाने हलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघापैकी विनायक राऊत यांची राजापूर विधानसभेवर भिस्त होती.

आमदार राजन साळवी आणि काँग्रेसची ताकद असलेला हा मतदार संघ आहे. त्यामुळे ४० ते ५० हजारापेक्षा जास्त मते मिळतील, अशी राऊत यांनी गृहित धरले होते; परंतु राणेंनी आपल्या राजकीय खेळीने ती १९ हजारांवर सीमित ठेवली. रत्नागिरी मतदार संघ राणेंना चांगला बोनस देणारा ठरेल, अशी अपेक्षा होती. येथील आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महायुती म्हणून जोरदार काम केले होते. प्रत्यक्षात राणे ९ हजार ६७८ नी पिछाडीवर पडल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तोच प्रकार चिपळूण मतदार संघात झाला. येथील आमदार शेखर निकम तर स्वतः प्रत्येक घराघरात फिरत होते; मात्र राऊत यांना २० हजार ६३१ चे मताधिक्य मिळाले.

ही निवडणूक म्हणजे एकप्रकारे विधानसभेपूर्वीची तालिम आहे. नारायण राणे यांचा विजय होताना सामंत आणि निकम यांना मतांच्या आकडेवारीत मात्र हार मानावी लागली आहे. राणेंना पडलेल्या मतांचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना अजून मजबूत आणि जागेवर आहे. राणेंना शिवसेनेचे हे मूळ हलविणे तेवढे सोपे नाही. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांना आपली राजकीय मूळे मजबूत करण्याचे मोठे आव्हान आहे.

RELATED ARTICLES

Most Popular