खासदार नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दाखल केली आहे. मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. राणेंनी मते विकत घेऊन आणि मतदारांना धमकावून मिळवलेला विजय रद्द करावा, असे याचिकेत म्हटले आहे. राऊत यांच्या संपर्क कार्यालयातून ही माहिती देण्यात आली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत राणेंनी शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांचा पराभव केला.
नारायण राणेंचा ४७ हजार ८५८ मतांनी विजय झाला; मात्र राणेंचा हा विजय कपटनीती आणि पैशांच्या जोरावर झाल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देत शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मते विकत घेऊन मतदारांना धमकावून विजय मिळवला, असा आरोप करत विनायक राऊत यांनी केला आहे.