25.8 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeKhedप्रवासी चिपळुणात; जादा गाड्या खेडमधून - कोकण रेल्वे

प्रवासी चिपळुणात; जादा गाड्या खेडमधून – कोकण रेल्वे

त्या चिपळूणमधून सोडल्या जाव्यात, अशी नागरिकांची मागणी होती.

खेड तालुक्याच्या निम्म्या भागातील प्रवासी रेल्वेने प्रवास करण्यासाठी चिपळूण रेल्वेस्थानकावर येतात. असे असताना परतीच्या मार्गावरील चाकरमान्यांसाठी रेल्वेने खेड इथून जादा रेल्वे सोडण्याची व्यवस्था केली. मध्य रेल्वेच्या या अजब प्रकारामुळे खेडसह चिपळूण तालुक्यातील प्रवाशांमध्ये नाराजी आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात आलेल्या चाकरमान्यांना मध्य आणि कोकण रेल्वेने दिलासा दिला आहे. गणेशभक्तांसाठी खेड ते सीएसएमटी, खेड ते पनवेलदरम्यान १४ अनारक्षित गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला; मात्र या गाड्या खेडमधून सोडण्यात आल्या आहेत. त्या चिपळूणमधून सोडल्या जाव्यात, अशी नागरिकांची मागणी होती.

अनारक्षित विशेष पनवेल येथून १३, १४ सप्टेंबरला सकाळी ११ वा. सुटली आणि खेड येथे त्याच दिवशी दुपारी २.४५ वा. पोहोचली. त्यानंतर दुसरी अनारक्षित विशेष गाडी १३, १४ सप्टेंबरला दुपारी ३.१५ वा. सुटली आणि पनवेल येथे त्याच दिवशी रात्री ८.३० वा. पोहोचली. या दोन्ही रेल्वे रविवारी (ता. १५) वेळापत्रकानुसार धावणार आहेत. या रेल्वेगाडीला पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक येथे थांबा आहे. आणखी एक अनारक्षित विशेष गाडी पनवेल येथून १३ व १४ ला रात्री ९.१० वा. सुटली आणि खेड येथे दुसऱ्या दिवशी रात्री १ वा. पोहोचली.

याच वेळापत्रकानुसार या रेल्वे 15 सप्टेंबरला धावणार आहेत. गाडी क्र. ०१०७० अनारक्षित विशेष खेड येथून १६ सप्टेंबरला सकाळी ६ वा. सुटेल आणि सीएसएमटी येथे त्याच दिवशी दुपारी १.३० वा. पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक येथे थांबे असतील.

RELATED ARTICLES

Most Popular