22.8 C
Ratnagiri
Friday, January 3, 2025

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक ! राजन साळवी

'सरकार बदलले आणि मला दिलेली वाय प्लस...

मुंबईकर महिलांचा जबरदस्त पराक्रम स्थानिक व्यापाऱ्याला खरपूस चोप!

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत...

पालकमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच रत्नागिरीत सामंत X कदमांमध्ये चुरस?

२३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर...
HomeRatnagiri'मातोश्री' भेटीबाबत बाळ मानेंचे मौन, पक्षात येणाऱ्यांचे स्वागत

‘मातोश्री’ भेटीबाबत बाळ मानेंचे मौन, पक्षात येणाऱ्यांचे स्वागत

पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे गटातर्फे शिवसेनेत येणाऱ्यांचे स्वागतच केले जाईल.

माजी आमदार बाळ माने यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे रत्नागिरीत राजकीय चर्चाना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे गटाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली ते मातोश्रीवर गेल्याचे समजते. बाळ माने यांनी मात्र मौन बाळगले आहे. या अनुषंगाने उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेने भविष्यात रत्नागिरीत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे माजी आमदार बाळ माने असो की अन्य कोणी सर्वसामान्य कार्यकर्ता असो पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे गटातर्फे शिवसेनेत येणाऱ्यांचे स्वागतच केले जाईल.

मातोश्रीकडून जे आदेश येतील त्यानुसार विधानसभेला जो उमेदवार देतील, त्याचे प्रामाणिक काम केले जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन उद्धव ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. त्यांचे हे वक्तव्य सूचक मानले जात आहे. राजेंद्र महाडिक म्हणाले, विधानसभेच्या चाचपणीसाठी नुकतेच निरीक्षक येऊन गेले. त्यांनी प्रत्येक प्रमुख पदाधिकारी, विभागप्रमुख, युवक, महिला पदाधिकारी यांच्याशी वैयक्तिक चर्चा केली. संभाव्य उमेदवारांबाबतची मते जाणून घेतली. त्यांनी, याबाबतचा अहवाल पक्षप्रमुखांकडे दिला आहे. त्यामुळे उमेदवारीबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेतील. पक्षप्रमुख जो कोणी उमेदवार देतील त्याचे काम प्रामाणिकपणे केले जाईल. उमेदवार मग तो बाहेरून आलेला असो की पक्षामधील सर्वांकडूनच पक्षाच्या आदेशाचे पालन होईल.

गणेशोत्सवापूर्वीपासून सर्वच विधानसभा मतदारसंघांत उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे भगवा सप्ताह सुरू आहे. ग्रामीण व शहरी भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घराघरांत मशाल पोहोचविण्याचे काम व सभासद नोंदणीला प्रतिसाद मिळाला आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही रत्नागिरी, लांजा-राजापूर व चिपळूण- संगमेश्वरमध्ये शिवसेना महाविकास आघाडीचे वर्चस्व राहील. “लोकसभेमध्ये ज्या बूथवर व भागात मशालला कमी मते मिळाली, त्याठिकाणी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विभागवार बैठका घेतल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, युवकचे तालुकाधिकारी प्रसाद सावंत आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular