26.5 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeRatnagiriअवैध मद्यसाठा, विक्री करणाऱ्यांवर नजर, चार पथके तैनात

अवैध मद्यसाठा, विक्री करणाऱ्यांवर नजर, चार पथके तैनात

१५ लाख ४४ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून अवैध मद्यसाठा, विक्री करणाऱ्यांवर कारवाईची जोरदार मोहीम सुरू आहे. या प्रकरणी एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आचारसंहिता लागल्यापासून आजपर्यंत १७६ लिटर हातभट्टीची गावठी दारू, देशी मद्य ६.६६ लिटर, गोवा राज्यातील निर्मित होणारे मद्य १२.२४ लिटर, रसायन १५०५ लिटर असा एकूण रुपये ८८ हजार २५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली. निवडणूक जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीत अवैध दारूची निर्मिती, वाहतूक तसेच विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्काची करडी नजर असून, त्या विरूद्ध कठोर कारवाई करण्यासाठी या विभागाकडून ४ पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसेच अवैध दारूधंद्यांना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पथकांकडून अवैध मद्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्याविरूद्ध केलेल्या कारवाईत १ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत हातभट्टीची गावठी दारू, देशी मद्य १३.६८ लिटर, विदेशी मद्य ९ लिटर, गोवा राज्यात निर्मित होणारे मद्य २०५.६५ लिटर, रसायन ३११५० लिटर, प्लास्टिकचे बॅरल, कॅन व काचेचे ग्लास असा एकूण रुपये १५ लाख ४४ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई-गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण-कराड या महामार्गावरून प्रवाशी तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी या विभागाकडून करण्यात येत आहे.

राज्य उत्पादन शुल्कचे आवाहन – जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व मद्यसाठा, बनावट माडीविक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास या विभागाचा व्हॉट्सअॅप क्र. ८४२२००११३३ व टोल फ्री क्र. १८००२३३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक शेडगे यांनी केले आहे. तक्रार देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular