26.5 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeKhedभगवान कोकरे यांचे उपोषण स्थगित, उद्योगमंत्री सामंत यांची मध्यस्थी

भगवान कोकरे यांचे उपोषण स्थगित, उद्योगमंत्री सामंत यांची मध्यस्थी

पालकमंत्री सामंत, आमदार नीलेश राणे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कोकरे यांनी उपोषण स्थगित केले.

खेड तालुक्यातील लोटे परशुराम येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम सेवा संस्थानच्या गोशाळा संदर्भातील विविध मागण्यांसाठी भगवान कोकरे महाराजांनी १७ मार्चपासून बेमुदत उपोषण छेडले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी कोकरे यांची आज भेट घेतली. वीजबिल माफ करण्याच्या महावितरण तर २५ लाखांचे रखडलेले अनुदान तत्काळ देण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सूचना केल्या. जागेचा प्रश्न अधिवेशन संपल्यानंतर मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले. त्यामुळे कोकरे यांना उपोषण स्थगित केले. लोटे परशुराम येथे गेल्या काही वर्षांपासून कोकरे गोशाळा चालवत आहेत. या गोशाळेत ११०० हून अधिक गाई आणि वासरांची देखभाल केली जाते; मात्र गोशाळेच्या प्रश्नांसाठी कोकरे यांना संघर्ष करावा लागत आहे. ते १७ मार्चपासून पाचव्यांदा उपोषणाला बसले होते. या उपोषणाच्या पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गो सेवाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी गोशाळेच्या चाऱ्याची दखल घेऊन गोपरिपोषण योजनेअंतर्गत ३३ लाख ४८ हजार रुपये गोशाळेच्या बँकखात्यात जमा केले आहेत.

गोशाळेचे मंजूर २५ लाखांचे अनुदान तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देण्याची शिफारस केली असतानाही ते अद्याप अदा झालेले नाही. ते अदा व्हावे. गोशाळेला व्यावसायिक दराने वीजपुरवठा होत असल्याने सुमारे साडेपाच लाख रुपये बिल थकीत राहिले आहे, ते बिल शासनाने माफ करावे. शेतीप्रमाणे वीजबिल आकारण्यात यावे, या प्रश्नांसाठी कोकरे यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले होते. या उपोषणाची दखल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेत कोकरे यांच्याशी गोशाळेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. यानंतर गोशाळेच्या थकीत वीजबिलासंदर्भात महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गोशाळेचे रखडलेले २५ लाख रुपयांच्या अनुदानासंदर्भात पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. तसेच गोशाळांच्या जागेसंदर्भात येत्या दोन-चार दिवसात बैठक घेऊन हा प्रश्नदेखील मार्गी लावू, अशी ग्वाही कोकरे यांना दिली.

आम्ही तुमच्यासोबत आहोत – दरम्यान, आमदार नीलेश राणे यांनी कोकरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून गोशाळीच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून ते प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करू. तुम्ही उपोषण मागे घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले. राणे यांच्यातर्फे माजी नगरसेवक परिमल भोसले, प्रफुल्ल पिसे यांनी कोकरे यांच्याशी संवाद साधला. पालकमंत्री सामंत, आमदार नीलेश राणे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कोकरे यांनी उपोषण स्थगित केले.

RELATED ARTICLES

Most Popular