27.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeKhedकशेडीच्या दोन्ही बोगद्यांत गळती

कशेडीच्या दोन्ही बोगद्यांत गळती

वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या दोन्ही बोगद्यांतून गळती सुरू आहे. दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका बोगद्यातील गळती थोपवण्याचा राष्ट्रीय महामार्गचा प्रयत्न फोल ठरला असून, नुकताच सुरू झालेल्या दुसऱ्या बोगद्यातून देखील पाण्याची गळती सुरूच आहे. ही गळती काढण्यासाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बोगद्यातील कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही गळती थांबता थांबेना झाल्या आहेत. त्या रोखण्यासाठी ‘ग्राउटिंग’चा अवलंबही फोलच ठरल्याने वाहनचालकांचा जीव टांगणी लागला आहे. त्यामुळे बोगद्यातून प्रवास करणाऱ्या दुचाकीचालकांचा प्रवास हा खडतरच राहणार असून, दोन्ही बोगद्यात ठिकठिकाणी लागलेल्या या गळतीने वाहनचालकांच्या गतिमान प्रवासात ‘विघ्न’ निर्माण झाले आहे. बोगद्यातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने ग्राउटिंगचा अवलंब केला.

यासाठी २० हजारांहून अधिक सिमेंट बॅगाचा वापर केल्यानंतर गळती थोपवण्यात यश आल्याचा दावाही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून केला जात होता; मात्र बोगद्यात गळती सुरूच आहे. त्यामुळे महामार्ग खात्याची डोकेदुखी वाढली आहे. बोगद्यात गळती सुरूच असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. बोगद्यातील कामावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही सुरू असलेल्या गळतींमुळे वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या या बोगद्यात गळती लागल्याचे दिसून येत असून या गळतीवर ठोस उपाययोजना व्हावी, अशी मागणी वाहनचालकांमधून जोर धरू लागली आहे. कशेडी बोगद्यातून प्रवास वेगवान अन् आरामदायी होण्याच्या शक्यतेने चाकरमानी बिनधास्त होते; मात्र बोगद्यात सुरू असलेल्या गळतीमुळे या बोगद्यातून प्रवास करताना दुचाकीचालकांना त्रास होत आहे. बोगद्यातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खाते आता कोणत्या नव्या उपाययोजनांचा अवलंब करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टनेलमधील विजेचा प्रश्नही सुटणार – दोन्ही बोगद्यात चोवीस तास वीजपुरवठा सुरू राहावा, यासाठी महावितरणकडून वीज घेण्यात येणार आहे. त्यासाठी ८० लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता; मात्र शासनाकडून संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महावितरणला लवकरच अनामत रक्कम भरली जाणार आहे. त्यानंतर महिन्याभरात वीजपुरवठा सुरू होईल. त्यासाठी ११ केव्हीची लाईन टाकण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular