२०२५ रोजी दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका एमएच-०८-बीएच ०००१ ते एमएच-०८ बीएच -९९९९ सुरु करण्यात येत आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते. त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व बऱ्याच वेळा नागरिकांनाही त्याचा त्रास होतो, नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा यासाठी ज्या दुचाकी/चारचाकी / परिवहन वाहन मालकांना नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहींत शुल्क (तीनपट शुल्क) भरुन हवे असतील त्यांनी २७ मार्च रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते दुपारी २ वाजता या दरम्यान विहित नमन्यात अर्ज करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे. दुचाकी / चारचाकी / परिवहन वाहनांची यादी २७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल.
यादीमधील एकाच क्रमांकासाठी दोन किंवा जास्त अर्ज असल्यास यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी २८ मार्च रोजी दुपारी २ वाजेपर्यंत सीलबंद पाकीटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कक्षात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधित अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दष्ट शुल्कापेक्षा जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल. दुचाकी मालिकेतील वाहनांसाठी उर्वरित आकर्षित नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासांठी २८ मार्च रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते दुपारी २ वाजता या दरम्यान विहीत नमुन्यात अर्ज करावा. दुचाकी वाहनांची यादी त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल.
यादीमधील एकाच क्रमांकासाठी दोन किंवा जास्त अर्ज असल्यास दुचाकी अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी २९ मार्च रोजी दुपारी २ वाजेपर्यंत सीलबंद पाकीटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कक्षात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधित अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल. सदर अर्ज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या सांक्षाकित प्रतीसह जमा करावा. सदर डीडी आरटीओ रत्नागिरी यांच्या नावे नॅशनलाईज / शेड्युल बँकेचा रत्नागिरी येथील असावा. अर्जदाराची ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत अर्जदाराने त्याचे फोटो ओळखपत्र केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५अ मध्ये विहीत केलेल्या पत्त्याच्या पुराव्यांनी (उदा. आधारकार्ड (आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक), टेलिफोन बिल इत्यादी) साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.