24.5 C
Ratnagiri
Sunday, December 7, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeDapoliबाणकोटमध्ये डेंगी संशयितामुळे यंत्रणा सतर्क आरोग्य विभागाकडून पाहणी

बाणकोटमध्ये डेंगी संशयितामुळे यंत्रणा सतर्क आरोग्य विभागाकडून पाहणी

संभाव्य धोकादायक भागांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जात आहेत.

तालुक्यातील बाणकोट गाव परिसरामध्ये डेंगी संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागास प्राप्त झाली आहे. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले असून, अहवालाची प्रतीक्षा असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांनी सांगितले. त्यामुळे मंडणगड तालुका आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांच्या मार्गदर्शनाने सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. संभाव्य प्रादुर्भाव टाळण्यासाठी ६ कर्मचाऱ्यांचे पथक तत्काळ पाठवण्यात आले. त्यानुसार ग्रामस्थांनाही मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात कार्यवाहीबाबत माहिती देऊन पुढील सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी.

अंगावर ताप, अंगदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, त्वचेवर चट्टे येणे अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित जवळच्या आरोग्यकेंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. खासगी रुग्णालये आणि तपासणी केंद्र येथे असे रुग्ण आल्यास त्यांची माहिती आरोग्य अधिकारी कार्यालयास देणे बंधनकारक आहे. त्यांनी तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

संभाव्य धोकादायक भागांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जात आहेत. ताप व अन्य डेंगीसदृश लक्षणे असलेल्या नागरिकांना तत्काळ उपचार व रक्ततपासणीची सोय उपलब्ध करून दिली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फॉगिंग आणि अँटी-लार्वा औषध फवारणी डेंगी संसर्गाचा धोका असलेल्या भागांमध्ये सकाळ व संध्याकाळी फॉगिंग आणि साचलेल्या पाण्यात डासांची पैदास रोखण्यासाठी अँटी-लार्वा औषध फवारणी केली जात असल्याचे नमूद केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular