22.6 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeKhedकोकरे बुवाची गोशाळा व गुरुकूल बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा !

कोकरे बुवाची गोशाळा व गुरुकूल बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा !

कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी सडेतोड मागणी केली.

“गोशाळेच्या आड अत्याचारांचा बाजार मांडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या ढोंगी बुवावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी” अशा मागणीचे निवेदन आज ‘श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी खेड, खेड तहसिलदार व खेड येथील पोलिस निरीक्षकांना देऊन त्या बुवाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी सडेतोड मागणी केली. लोटे येथील विकृतीचा बाजार मांडणाऱ्या तथाकथित बुवावर जरब बसेल अशी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता जनतेतून व्यक्त होऊ लागली आहे.

जरब बसणारी कारवाई – याबाबत ‘श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान’चे उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख श्री. प्रशांत सुभाष सावंत, खेड ता. प्रमुख श्री. योगीराज रविंद्र चव्हाण व खेड शहर प्रमुख श्री. अमोल अशोक जाधव यांनी याबाबतचे आपले खणखणीत निवेदन खेड येथील प्रांताधिकारी, खेड तहसिलदार व खेड पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक यांना सादर केले. विकृतीचा बाजार मांडणाऱ्या त्या बुवाला जरब असेल अशी जबर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

बुवाला फाशी देण्याची मागणी – एक नव्हे तर लागोपाठ दोन पीडीत अल्पवयीन मुली धैर्याने पुढे आल्या आणि त्यांनी कोकरे बुवाने वारंवार त्यांच्यावर केलेल्या अत्याचाराची तक्रार केली. बुवाने त्यांचे शारीरिक व मानसिक शोषण केले. गुरुकुल व वारकरी संप्रदाय अशा गोंडस नावाखाली अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे तक्रारीत पुढे आले आहे. पीडीतेच्या तक्रारीनुसार बुवा तिच्या आजारपणाचा फायदा घेत हस्तप्रयोग करी, अतर्वस्त्रांना हात घाली, लैंगिक अत्याचार व लैंगिक शोषण करी व वाच्यता न करण्याची धमकी देई. हे सर्व भयानक असून जरब बसण्यासाठी त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांनी खणखणीत मागणी केली.

अन्यथा तीव्र आंदोलन ! – “लोटे परशुराम येथे ‘गुरुकूल’च्या नावाखाली सुरु असलेला विकृतीचा बाजार नेस्तनाबूत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊल उचलणे आवश्यक आहे. प्रशासन ‘ढिम्म ‘पणे ही सर्व भयावह विकृती पाहू शकत नाही. प्रशासनाने तडफेने गोशाळा व गुरुकूल बंद करण्याची कारवाई करावी व हा विकृतीचा बाजार थांबवावा अन्यथा दशक्रोशीतील नागरिक, ग्रामस्थ व वारकरी बांधव तीव्र आंदोलन सुरु करतील” अशा शब्दात त्यांनी यावेळी इशारा दिला.

कोकरे बुवाच्या कृत्यांची कसून चौकशी मागणी – बुवाचे हे धक्कादायक प्रताप उघड झाल्यानंतर साऱ्या लोटे परिसरातील नागरिक, वारकरी बांधव व अनेक सामाजिक संघटना पुढे सरसावल्या असून हा विकृतीचा बाजार बंद होईपर्यंत व पीडीत अल्पवयीन मुलींना न्याय मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अनेक सहकाऱ्यांनी आधीच संस्थेतील पदांचा राजीनामा दिला असून गोशाळा व गुरुकूल यांच्या नावाखाली जे काही सुरु होते त्याची कसून चौकशी करण्याची मागणी आता जनतेतून व्यक्त केली जात आहे.

कोकरे बुवाची तात्काळ पदावरुन उचलबांगडी ! – भगवान कोकरे बुवाची ‘शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना’ या संघटनेच्या कोकण विभाग समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु या बुवाचे हे थेर जगजाहीर होताच ती नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या व्यक्तीस जबाबदारीच्या पदावर राहण्याची कदापि परवानगी दिली जाणार नाही असेही त्या संघटनेतर्फे प्रसिध्दीला देण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. बुवाची कोकण विभाग समन्वयक पदावरुन तात्काळ उचलबांगडी करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular