19.6 C
Ratnagiri
Sunday, November 16, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriकोरे'कडे ४ हजार कोटींचे नवे प्रकल्प...

कोरे’कडे ४ हजार कोटींचे नवे प्रकल्प…

कोकण रेल्वेने नवीन मोबाईल अॅप सादर केले आहेत.

कोकण रेल्वेला आर्थिक वर्षात १३७ कोटी ६९ लाखांचा नफा झाला असून, ४ हजार १५७ कोटींचे नवे प्रकल्प उभारण्याचा ठेका मिळाला आहे. त्यात ३ हजार कोटींचे वीजप्रकल्प आहेत. केरळमधील अनक्कंपोईल-कल्लडी-मेप्पडी बोगदा मार्ग प्रकल्प आणि वायझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराला रेल्वेजोडणीसाठीचा प्रकल्पही कोरेमार्फत उभारण्यात येणार आहे तसेच कटरा-बनिहाल सेक्शनवरील अभियांत्रिकी, सिग्नल व दूरसंचार आणि विद्युत मालमत्तेच्या देखभालीसाठीचा ठेकाही कोकण रेल्वेला देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात कोरेच्या नफ्यात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने नवी मुंबईतील वाशी येथील सिडकोच्या सभागृहात ३५वा वर्धापनदिन साजरा केला. या प्रसंगी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी कंपनीच्या ३५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा मांडला. या सोहळ्याला संचालक (वित्त) राजेश एम. भडांग, संचालक सुनील गुप्ता आणि राजीव कुमार मिश्रा उपस्थित होते.

उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पातील कटरा-संगलदान सेक्शनची बांधणी कोकण रेल्वेने केली. कटरा-श्रीनगर प्रकल्प चिनाब नदीवर उभारलेला आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे कमानीचा पूल असून, भारतातील पहिला केबल-स्टे रेल्वेपूल आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेने ४ हजार २०२ कोटीचे उत्पन्न मिळवले. त्यात १३७ कोटी ६९ लाखाचा नफा मिळवला आहे. कोरेने ४ हजार १५७ कोटींच्या नव्या प्रकल्पांसाठीची कामे मिळवली असून, त्यामध्ये ३ हजार कोटींचे वीजप्रकल्प आहेत तसेच केरळमधील अनक्कंपोईल-कल्लडी-मेप्पडी बोगदा मार्ग प्रकल्पाला पर्यावरण मंजुरी मिळाली असून, १ हजार ३४१ कोटींचे पत्र कोरेला प्राप्त झाले आहे. केरळ सरकारने वायझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरासाठी रेल्वेजोडणीसाठी १ हजार ४८२ कोटींच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मंजुरी दिली आहे. उत्तर रेल्वेने कटरा-बनिहाल सेक्शनवरील अभियांत्रिकी, सिग्नल व दूरसंचार, आणि विद्युत मालमत्तेच्या देखभालीसाठी ९५२ कोटींचा पाच वर्षांचा ठेका कोकण रेल्वेला मिळाला आहे.

नवे मोबाईल अॅप – कोकण रेल्वेने नवीन मोबाईल अॅप सादर केले असून, त्यात प्रवाशांनी आवश्यक माहिती, महिलांसाठी सुरक्षाविषयक वैशिष्ट्ये, मालवाहतूक व्यवसाय साधने, दिव्यांगांसाठी उपयुक्त वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

Most Popular