HomeRatnagiriबँक ऑफ महाराष्ट्र रत्नागिरीतर्फे भव्य ग्राहक मेळावा संपन्न; योजनांची माहिती

बँक ऑफ महाराष्ट्र रत्नागिरीतर्फे भव्य ग्राहक मेळावा संपन्न; योजनांची माहिती

उद्योजक, बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; झोनल मॅनेजर सागर नाईक यांचे मार्गदर्शन

रत्नागिरी: ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासोबतच त्यांच्या सुरक्षित बचतीला आणि भविष्यातील आर्थिक नियोजनाला दिशा देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, अंचल कार्यालय रत्नागिरीच्या वतीने एका भव्य ‘ग्राहक संपर्क मेळाव्याचे’ (Customer Outreach Program) आयोजन करण्यात आले होते. शहरातील सिद्धीविनायक मंगल कार्यालय येथे सायंकाळी ६:०० वाजता हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला स्थानिक उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, विविध सामाजिक व व्यापारी संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह बँकेचे खातेदार व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठेवी व विविध कर्ज योजनांची दिली माहिती

बँकेच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध आकर्षक ठेव योजना (Fixed Deposits & Savings Schemes) तसेच वैयक्तिक, गृह आणि व्यावसायिक कर्ज योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. बदलत्या आर्थिक गरजांनुसार सुरक्षित गुंतवणूक कशी करावी आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी कोणत्या कर्ज योजना फायदेशीर ठरतील, याचे मार्गदर्शन या वेळी करण्यात आले.

झोनल मॅनेजर सागर नाईक यांचे मार्गदर्शन

या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर श्री. सागर नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी बँकेच्या आधुनिक डिजिटल बँकिंग सेवा, ग्राहकाभिमुख नवीन योजना आणि सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बँकिंग व्यवहार कसे अधिक सुलभ व जलद करता येतात, यावर त्यांनी भर दिला.

ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि थेट संवाद

कार्यक्रमादरम्यान उपस्थित ग्राहकांनी बँकेच्या पारदर्शक व ग्राहकस्नेही सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. या मेळाव्यात ग्राहकांच्या विविध शंका व प्रश्नांचे थेट निरसन करण्यात आले. बँकेचे अधिकारी आणि ग्राहक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक घट्ट करणारा हा मेळावा अत्यंत यशस्वी ठरला.

RELATED ARTICLES

Most Popular