HomeMaharashtraदुकानातील सुटे दूध, तूप आणि वनस्पती तेल खरेदी करू नका; FDA चा...

दुकानातील सुटे दूध, तूप आणि वनस्पती तेल खरेदी करू नका; FDA चा इशारा

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नागरिकांना आरोग्याबाबत महत्त्वाचे आवाहन, केवळ सीलबंद वस्तू वापरण्याचे निर्देश.

मुंबई: सध्याच्या धावपळीच्या युगात आपण आरोग्याबाबत अनेकदा अनवधानाने दुर्लक्ष करतो. मात्र, बाजारात मिळणाऱ्या खाध्यपदार्थामधील भेसळ आपल्या आरोग्याशी थेट खेळ करू शकते. हीच बाब गांभीर्याने घेत अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि सावध करणारे आवाहन केले आहे. अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, नागरिकांनी कोणत्याही किराणा किंवा दुकानांमधून उघड्यावर विकले जाणारे सुटे दूध, सुटे तूप आणि वनस्पती तेल खरेदी करणे तातडीने टाळावे.

केवळ सीलबंद आणि पाश्चराईज्ड दुधाचाच वापर करा

बाजारात अनेक ठिकाणी उघड्यावर किंवा कॅनमधून सुटे दूध विकले जाते. मात्र, अशा दुधाच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत कोणतीही खात्री नसते. यावर भर देत आयुक्तांनी स्पष्ट केले की, नागरिकांनी नेहमी नामांकित ब्रँड्सचे सीलबंद पाश्चराईज्ड दूध (Pasteurized Milk) आणि पॅकबंद उत्पादनेच खरेदी करावीत. यामुळे दुधातील जिवाणू संसर्गाचा धोका टळतो.

दूध साठवणूक आणि तापमानाचे महत्त्व

तज्ज्ञांच्या मते, गाई किंवा म्हशीचे दूध काढल्यानंतर ते जर दोन तासांपेक्षा जास्त वेळ उघड्यावर किंवा सामान्य तापमानात तसेच राहिले, तर त्यामध्ये वेगाने आम्लता (Acidity) वाढवणारे घटक आणि हानिकारक बॅक्टेरिया तयार होऊ लागतात. अशा प्रकारचे दूषित दूध शरीरात गेल्यास पोटदुखी, फूड पॉयझनिंग किंवा इतर गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे दुधाची साठवणूक योग्य तापमानाखाली होणे अत्यंत गरजेचे आहे, ज्याची खात्री सुट्या दुधाच्या बाबतीत होत नाही.

अन्नडात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा

सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्नपदार्थामध्ये बेसुमार भेसळ करणाऱ्या फेरफार करणाऱ्या विक्रेत्यांना तुकाराम मुंढे यांनी सज्जड इशारा दिला आहे. एफडीए (FDA) अशा दुकानदारांवर आणि उत्पादकांवर अत्यंत कठोर कारवाई करणार असून कसलीही सूट दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

आरोग्य हीच खरी संपत्ती असून, नागरिकांनी खाध्यपदार्थ खरेदी करताना जागरूक राहावे आणि प्रशासनाच्या या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular