26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRatnagiriवादळ आणि कोकण किनारपट्टी

वादळ आणि कोकण किनारपट्टी

कोकण आणि वादळ याचं नक्की काय समीकरण आहे, काही कळतच नाही. मागच्या वर्षी येऊन थडकलेल्या निसर्ग चक्रीवादळातून सावरत असताना आत्ता राज्याला या आलेल्या तोक्ते चक्रीवादळाचा  तडाखा बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून या वादळापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याच्या वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत. अरबी समुद्रात तयार झालेलं हे तोक्ते चक्रीवादळ थोड्या थोड्या कालावधीने अधिक वेगवान होत असून त्यामुळे विविध ठिकाणी प्रचंड प्रमाणात हानी झालेली दिसून येत आहे. हवामान खात्यानं जाहीर केल्लेल्या वृत्तानुसार वादळामुळे केरळ, गोवा, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र अशा अनेक भागामध्ये घोंघावणाऱ्या वादळी वाऱ्यासह दमदार पावसानं हजेरी लावली आहे. दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या वादळाचे थेट पडसाद केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा समुद्र किनारपट्टी लगतच्या भागामध्ये दिसून आले. हे तोक्ते चक्रीवादळ १८ मेच्या दरम्यान गुजरात किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोकण किनारपट्टीवर या तोक्ते चक्रिवादळानं रविवारी चांगलाच कहर माजवला. यासोबत आता मुंबईमध्येही जरी वादळ आदळणार नसले तरी, त्याचे थेट परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे पूर्वनियोजन करून अनेक योजना राबविण्यास सुरुवातही केली गेली आहे. चक्रीवादळाबद्दलचा सतर्कतेचा देण्यात आलेला इशारा लक्षात घेऊन मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना आखल्या गेल्या आहेत. त्यासोबत मच्छिमार बांधवाना देखील आवाहन करण्यात आले आहे कि, या वादळाजन्य परिस्थितीमध्ये आपल्या होड्या किनाऱ्यावर बांधून ठेवाव्या आणि कोणीही मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये. रविवारी सकाळपासून केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टी भागामध्ये जोरदार वारा आणि पावसाने मारा केल्यानंतर आता तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं पुढं निघून गेले आहे. तोक्ते चक्रीवादळामुळे किनाऱ्यालगतच्या परिसरात जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस पडला. कोकण किनारपट्टीवरही त्याचे पडसाद उमटलेले दिसले. अनेक ठिकाणी समुद्राच्या पाण्याने पातळी ओलांडल्याने गावांमध्ये पाणी शिरल्याचं दृश्य पाहायला मिळालं. या घटनांमुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले आहे. तर शेकडो घरे, बागा, शेती, रस्ते उद्ध्वस्त झाल्याचे चित्र समोर आले आहे. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने वीज गेल्याने सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरलेले व झाडे उन्मळून पडलेली दिसत आहेत. काही ठिकाणी घरांवर झाडे पडल्याने अनेकांनी घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला आहे. तर काही ठिकाणी किनारपट्टी लगतच्या धोकादायक ठरू शकणारया भागातील लोकांना शासनाने आधीच स्थलांतरीत केले आहे.

cyclone in 2021

सोमवारी रात्री तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या समुद्रकिनार्यावर जाऊन धडकले. त्यावेळी चक्रीवादळाचा वेग ताशी 185 किलोमीटर इतका होता. चक्रीवादळामुळे गुजरातच्या अनेक ठिकाणी उंच आणि मोठी झाडं उन्मळून पडल्याचे दृश्य समोर आले. वादळासोबत सोसाट्याच्या वारा आणि जोरदार पर्जन्यवृष्टी देखील होत होती. तोक्ते वादळ जरी गुजरातमध्ये पोहोचल असलं तरी त्याच्या मार्गात येणाऱ्या कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या चक्रीवादळाची सर्वाधिक अधिक झळ कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना पोहोचली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानी बद्दल पंचनाम्याचं काम वेगाने करण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी पर्यंत सरासरी १३२.११  मिमी तर एकूण ११८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तोक्ते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कोकणचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री येत्या शुक्रवारी २१ मे ला कोकण दौऱ्यावर जाणार असून तोक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.

चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी पडझड आणि नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. चक्रीवादळामुळे अनेक बोटी आणि मोठी जहाजं खवळलेल्या समुद्रामध्ये अडकलेल्या अवस्थेत होत्या. वेगवान वारा आणि पावसामुळे काही बार्ज दूरपर्यंत भरकटत गेली, नौदलानं रेस्क्यू ऑपरेशन राबवत बोटी आणि जहाजांवर अडकलेल्या अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी त्वरित मदतकार्य सुरु केलं. नौदलाची शोधमोहीम रात्रभर सुरु होती. तोक्ते चक्रीवादळात भरकटलेल्या पी-३०५ या नौकेवरच्या कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी भारतीय नौदलाची हेलिकॉप्टर्स घटना स्थळी तातडीने दाखल झाली. सकाळी ६ वाजेपर्यंत १४६ लोकांना रेस्क्यू केलं गेलं. परंतु जे बार्जवरील ३४ लोकांचा मृत्यु ओढावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गुजरात राज्याची हवाई पाहणी केली आहे. त्यांनी वादळाच्या नुकसानग्रस्त भागाची हवाई सफर करून वादळामुळं झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या संदर्भात अहमदाबादला मिटिंग घेतली. या बैठकीला गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाना २ लाख रुपयांची मदत, तर जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तोक्ते चक्रीवादळामुळे गुजरातचा दौरा पाहणीनंतर पंतप्रधान मोदींनी गुजरातसाठी तातडीची मदत म्हणून १ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular