27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeIndiaकोरोना रॅपिड अँटीजन टेस्ट किटला मंजुरी

कोरोना रॅपिड अँटीजन टेस्ट किटला मंजुरी

कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, त्यामध्ये निर्माण होणार्या समस्या, त्यावर काढलेले तोडगे यामध्येच दिवसेंदिवस आपले शास्त्रज्ञ, वैज्ञानिक युद्ध पातळीवर संशोधन करत आहेत. शासन सुद्धा वेगवेगळी धोरण अवलंबण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. बुधवारी कोरोना चाचणीबाबत इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीएमआरने कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवली तर घरीच कोरोना चाचणी पडताळून पाहण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट किटला परवानगी दिली आहे. या किटच्या माध्यमातून लोकांना नाकातून स्वाब सँपल घेऊन स्वतः ही टेस्ट करता येणार आहे. त्याचा वापर कसा करायचा याबाबत देखील नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.

आयसीएमआर कडून असे स्पष्ट करण्यात आले आहे कि, हे टेस्टिंग कीट फक्त होम टेस्टिंग लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांसाठी किंवा नकळतपणे इतर कोरोना संक्रमण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी पर्याय आहे. होम टेस्टिंग किट तयार करणाऱ्या मायलॅब डिस्कव्हरी सॉल्युशन लिमिटेड कंपनीने सांगितले की, ही चाचणी मॅन्युअल पद्धतीने करता येणार आहे. त्यासाठी गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरुन COVISELF नावाचे अॅप डाउनलोड करावा लागणार आहे. आणि सर्व गोष्ठी पूर्ण केल्यावर अवघ्या दीड ते अडीच तासामध्ये मोबाइल अॅपवरुन तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त होईल. पुण्यातील माय लॅब डिस्कवरी सॉल्यूशन लिमिटेड कंपनीला होम आयसोलेशन टेस्टिंग किटसाठी अधिकृतपणे मान्यता देण्यात आली आहे. तसेच, या टेस्टिंग किटला नाव COVISELF असे देण्यात आले  आहे.

corona antigen rapid test

त्यामुळे साधारण लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांसाठी आता घरबसल्या कोविड-19 चाचणी करणे शक्य झाले आहे. आयसीएमआरने कोविड-19 च्या चाचणीसाठी होम बेस्ड रॅपिड अँटीजन टेस्ट किटला मंजुरी दिली आहे. हे एक होम रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट असून, याचा वापर कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले किंवा बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले लोकचं करु शकतात. विशेष म्हणजे घरात केलेल्या या अँटीजन टेस्टचा अहवाल अॅपच्या माध्यमातून आयसीएमआरपर्यंत पोहोचेल आणि तिथे तो गोपनीयपणे ठेवला जाईल.

आयसीएमआरने कोविड चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी दिल्यानंतर आता घरीच टेस्ट करणं अतिशय सोइच पडणार आहे. भारतामध्ये केवळ मायलॅब डिस्कव्हरी सॉल्युशन लिमिटेड या एकाच कंपनीला या किटसाठी मंजुरी देण्यात आली आहे. होम टेस्टिंग करणाऱ्या सर्वांना हे अॅप डाऊनलोड करावं लागणार असून, या मोबाईल अॅपमध्ये टेस्टिंग बाबतची संपूर्ण रितसर प्रक्रिया योग्य प्रकारे देण्यात आली आहे. हे अॅप फक्त पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एवढाच निष्कर्ष देतं. या अॅपची मांडणी एवढी सुयोग्य रित्या केलेली आहे. सर्व युझर्सनी डाऊनलोड करुन नोंदणी केलेल्या मोबाईलमध्येच चाचणी पूर्ण झाल्यानंतर टेस्ट स्ट्रिपचा फोटो काढून अपलोड करायचा आहे. त्यानंतर या अॅपमध्ये असलेला डेटा सुरक्षित सर्व्हरवर जमा केला जातो, जो आयसीएमआर कोविड-19 च्या टेस्टिंग पोर्टलशी लिंक्ड केलेला असतो. सध्या कोविड-19 चाचणीसाठी अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचणीचा पर्याय उपलब्ध आहे. अँटिजेन चाचणीचा अहवाल लगेचच मिळतो,  तर आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यासाठी २४  तासाचा अवधी लागतो. आता या होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी मिळाल्याने कोरोना चाचणी करण्याला वेग येईल आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या लोकाना घर बसल्या कोरोना टेस्ट करणे शक्य होईल.

चाचणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर सर्व व्यक्तींना असा सल्ला देण्यात आला आहे कि, त्यांनी आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाने आखून दिलेल्या होम आयसोलेशनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणे अनिर्वाय आहे. तसेच या रॅपिड अँटिजन टेस्ट रिपोर्टमध्ये निगेटिव्ह आलेल्या परंतु कोरोनाची काही प्रमाणात लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्तींनी तातडीने आपली आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी, कारण काही वेळा रॅपिड अँटिजेनमध्ये कमी व्हायरल लोडमुळे अशा प्रकारचा अहवाल देखील प्रदर्शित होऊ शकतो.

RELATED ARTICLES

Most Popular