27.3 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeKhedकोंडिवली धरणात काका-पुतण्याचा बुडून मृत्यू

कोंडिवली धरणात काका-पुतण्याचा बुडून मृत्यू

रविवारी खेडमध्ये कोंडीवली धरणांमध्ये आठ वर्षाच्या मुलासह एका चाळीस वर्षाच्या इसमाचा बुडून मृत्यू झाला आहे.

चिपळूण तालुक्यातील दोन जणांची बुडण्याची घटना ताजी असतानाच , आत्ता खेड तालुक्यातील कोंडीवली धरणामध्ये सेल्फी काढताना बुडणाऱ्या पुतण्याला वाचविताना चुलत्याचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. इम्रान याकूब चौगुले वय ४०, रा. निळीक, ता. खेड आणि पुतण्या सुहान फैजान चौगुले वय १०, रा. निळीक, ता. खेड असे मृत्यमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, इम्रान चौगुले हा पुतण्या सुहान, मुलगी लाईबा वय ८ , मुलगा याकूब वय ४ यांना घेऊन रविवारी सायंकाळी कोंडीवली धरण परिसरात फिरायला गेले होते. हल्लीची लहान मुले मोबाईलवर जास्त वेळ व्यतीत करताना दिसतात. यावेळी सुहान हा मोबाईलवर सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उतरला. यावेळी तो पाय घसरून खोल पाण्यात पडून बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी इम्रान चौगुले त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. दरम्यान, यावेळी दोघांचाही बुडून मृत्यू झाला. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी खेड पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन बुडालेल्या दोघांचेही मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. रात्री नऊ वाजता दोघांचे मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.

दरम्यान, कोळकेवाडी धरणात देखील काही दिवसांपूर्वी चार जण पाण्यात मस्ती करत असताना बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी खेडमध्ये कोंडीवली धरणांमध्ये आठ वर्षाच्या मुलासह एका चाळीस वर्षाच्या इसमाचा बुडून मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील धरणावर देखरेखीसाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची मागणी होऊ लागली आहे. जेणेकरून नवीन तिथे कोणी येणाऱ्यांना पाण्याची माहिती दिली असता अथवा रोकले असता अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत.

RELATED ARTICLES

Most Popular