दिवा ते चिपळूण मार्गावर १३ सप्टेंबरपासून ३ ऑक्टोबरपर्यंत मेमू स्पेशल’ गाडी चालवण्यात येणार आहे. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे मुंबईहून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. १३ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत युवा चिपळूण मेमो स्पेशल गाडीच्या एकूण ३६ फेऱ्या होणार आहेत. दिवा ते चिपळूण मेमू स्पेशल दिवा येथून ७ वाजून ४५ मिनिटांनी सुटून चिपळूणला १ वाजून २५ मिनिटांनी पोहोचणार आहे. चिपळूणला आलेली मेमू स्पेशल गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १ वा. सुटून रात्री ७ वा. दिवा जंक्शनला पोहोचेल.
दिवा चिपळूण मेमू स्पेशल गाडीचे थांबे पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापेवामने, करंजाळी वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी, खेड तसेच अंजनी. दिवा ते चिपळूण ही आठ डब्यांची गाडी असेल. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे नियमित आणि विशेष गाड्यांचे कन्फर्म आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आधी कोकण रेल्वे तसेच मध्यरेल्वेने रत्नागिरीपर्यंत धावणारी मेमू स्पेशल गाडीदेखील जाहीर केली आहे.