रत्नागिरी शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बुधवार दिनांक २२ रोजी पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी बैठक बोलावली आहे. यामध्ये अनेकंदां इमारतींची अंदाजपत्रके वाढीव का होतात? यात काही अर्थपुर्ण व्यवहार होत नाहीत ना? मुद्दाम वाढ केली जात नाही ना? असे प्रश्न उपस्थित केले जाणार का याकडे लक्ष लागले आहे. यासंदर्भात अधिक तपशिल असा की, शहर परिसरात गेले काही वर्षात ना. सामंत यांनी उपलब्ध केलेल्या निधीत कोट्यवधी रूपयांची विकासकामे झाली आहेत. मात्र या कामांची मुळ अंदाजपत्रके आणि वाढीव अंदाजपत्रके यातील तफावत फार मोठी असल्याने या सर्व प्रकाराची चौकशी पालकमंत्र्यांनी करावी, अशी मागणी होत आहे.
मुळ अंदाजपत्रक बनविताना ते परिपुर्ण का नसते? यांमध्ये अंतर्गत सजावट, फर्निचर, विद्युतिकरण, लिफ्ट, अग्निशामक यंत्रणा आदींचा समावेश असणे गरजेचे आहे. मात्र याठिकाणी वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. अंदाजपत्रके तयार करताना काही बाबी राखून ठेवल्या जात असल्याने त्याम ागचे नेमके कारण तरी काय अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. रत्नागिरी शहरात उभ्या राहणाऱ्या इमारतीपैकी जिल्हा परिषदची इमारत, पंचायत समितीची इमारत, जिल्हाधिकारी कार्यालयातील वाढीव इमारती अशा अनेक ठिकाणी अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर पुन्हा नव्याने अधिक रक्कमेचे, अंदाजपत्रक मंजूरीसाठी पाठविले जाते. सुधारीत अंदाजपत्रकांची रक्कम थक्क करणारी असते. बाजारातील खासगी दरापेक्षा त्यात मोठी तफावत असते.
यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते. अनेकदा मुळ अंदाजपत्रक परिपूर्ण नसल्याने इमारतीची कामे अर्धवट राहतात. पुन्हा निधीची म ागणी होवून तो मंजूर होईपर्यंत बांधकाम साहित्याचे दर वाढतात. मग पुन्हा नवे अंदाजपत्रक केले जाते. यात जनसाम ान्यांच्या करातून गोळा होणारा पैसा मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याचे दिसते. या सर्व बाबींची दखल घेवून पालकमंत्री झाडाझडती घेणार का? याकडे लक्ष लागून राहिलेआहे.