शेतकरी कुटुंबातील नसताना तसे दाखवण्यासाठी खोटा सातबारा जोडून शासनाची फसवणूक केली म्हणून अतुल लिमये (रा. पुणे) याच्याविरोधात दापोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयदीप बलकवडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. यातील आरोपी अतुल लिमये यांनी दापोली तालुक्यातील जालगांव येथे ३३ गुंठे जागा चिंतामणी नरहर फाटक व नयन फाटक (रा. अलिबाग) यांना ६ लाख रुपये देवून त्यांचेकडून जमीन खरेदी केली होती.
त्याचे खरेदीखत दुय्यम निबंधक कार्यालय दापोली येथे तयार करताना शेतकरी कुटुंबातील नसताना तसे दाखवण्यासाठी स्वतःच्या नावे यातील आरोपी अतुल लिमये यांनी मौजे होतले, ता. मुळशी, जि. पुणे येथे गट नं. ७७१ चा खोटा सातबारा तयार करून तो जोडून शासनाची फसवणूक केली. म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.