26.1 C
Ratnagiri
Thursday, July 18, 2024

जिल्ह्यात २० तारीखे पर्यंत रेड अलर्ट…

जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून...

‘सिव्हिल’मधील समस्यांचा वाचला पाढा – शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

गोरगरिबांचा आधार असलेल्या जिल्हा रुग्णालयाची वरून रंगरंगोटी...

चिपळूणमध्ये विहिरीतील पाण्यात मगरीचे पिल्लू, वनविभागाने पकडले

शहरातील वाणीआळीतील एका विहिरीत पुराच्या पाण्याबरोबर मगरीचे...
HomeRatnagiriकोकण मार्गावरील रेल्वेगाड्या लेट, प्रवाशी हैराण

कोकण मार्गावरील रेल्वेगाड्या लेट, प्रवाशी हैराण

रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

कोकण मार्गावरून धावणाऱ्या ८ ‘रेल्वेगाड्यांना ‘विकेंड’लाही ‘लेटमार्क’ मिळाला. रविवारी कोच्युवेली एलटीटी एक्स्प्रेसच्या प्रवाशांची तब्बल ७ तास रखडपट्टी झाल्याने प्रवाशांना घाम फटला. एलटीटी-थिविमसह एलटीटी-मडगाव ५ तास विलंबाने मार्गस्थ झाल्याने. प्रवाशांचा मनस्ताप कायम राहिला. अन्य ५ रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाल्याने प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागला. रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. उन्हाळी सुट्टीचा हंगाम संपुष्टात आल्याने चाकरमानी परतीला निघाले आहेत. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्या हाऊसफुल्लच धावत असून प्रवाशांना रेल्वेगाड्यांमध्ये एन्ट्री मिळवताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.

तोबा गर्दीमुळे प्रवाशांना लटकंतीचा प्रवास करावा लागत असून इच्छितस्थळ गाठताना प्रवाशांची दमछाक होत आहे. विक्रमी गर्दीमुळे प्रवाशांचा रेटारेटीचा अन् लोंबकळत प्रवास सुरू असतानाही चाकरमानी रेल्वेगाड्यांना सर्वाधिक पसंती देत आहेत. एकीकडे चढाओढीचा प्रवास सुरू असताना दुसरीकडे विलंबाच्या प्रवासाचा मनस्तापही कायमच आहे. नागपूर-मडगाव स्पेशल ४ तास २० मिनिटे, तर सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस २ तास ४५ मिनिटे रविवारी उशिराने रवाना झाल्या. एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस ५ तास १५ मिनिटे तर कोच्युवेली एक्सप्रेस २ तास १५ मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली.

ओखा एक्स्प्रेस २ तास ४० मिनिटे तर जामनगर-तिरूनेलवेली एक्स्प्रेस १ तास विलंबाने धावली. यापाठोपाठ्च सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेस १ तास ३० मिनिटे उशिराने रवाना झाली. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या विस्कळीत वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका बसत आहे. ‘विकेंड’लाही रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडल्याने प्रवाशांना यातायातीचा प्रवास करत इच्छितस्थळ गाठावे लागले. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे विस्कळीत वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular