31.6 C
Ratnagiri
Thursday, April 25, 2024

चिपळुणात हापूसच्या नावाखाली कर्नाटकच्या आंब्यांची विक्री

शहरात हापूस आंबा विक्रीमध्ये परप्रांतीय विरुद्ध स्थानिक...

माझ्या जीवात जीव असेपर्यंत काम करत राहणारः सुनिल तटकरे

निवडणूका येतात जातात, मात्र आम्ही जनतेच्या कामासाठी...

अमित कदम यांचा राष्ट्रवादी पवार गटात कार्यकर्त्यांसह प्रवेश

महाराष्ट्रीय यादव चॅरिटेबल ट्रस्टचे श्रीकृष्ण हॉल, नायगाव...
HomeRatnagiriगेली दहा वर्ष सरपंच पदावर असून देखील पराभव, तडकाफडकी राजीनामा

गेली दहा वर्ष सरपंच पदावर असून देखील पराभव, तडकाफडकी राजीनामा

टेंभ्ये ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने शिंदे गटाच्या रत्नागिरी तालुका महिलाप्रमुख कांचन नागवेकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटाच्या महिला तालुकाप्रमुख कांचन नागवेकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. रत्नागिरी तालुक्यातील टेंभे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उभ्या असलेल्या कांचन नागवेकर यांचा पराभव झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

शिंदे गटाच्या शिवसेनेच्या त्या रत्नागिरी महिला तालुकाप्रमुख होत्या. गेली दहा वर्ष टेंभे ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी कांचन नागवेकर होत्या. यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेना महिला तालुकाप्रमुख या पदाचा त्यांनी राजीनामा जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्याकडे कालच सोपवला आहे.

दरम्यान, कांचन नागवेकर यांनी आपल्या राजीनाम्याबाबत स्पष्ट केले की, मी टेंभे गावातून सरपंच पदासाठी निवडणूक लढवत होते. पण या निवडणुकीत मी ३०० मतांनी पराभूत झाल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारुन मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा जिल्हाप्रमुख यांच्याकडे सादर केला आहे. टेंभ्ये ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने शिंदे गटाच्या रत्नागिरी तालुका महिलाप्रमुख कांचन नागवेकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे शिंदे गटासह राजकीय क्षेत्रात एकाच चर्चेला उधाण आले आहे. वरिष्ठ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये अनेकांना मतदारांनी धक्के दिले. तसा धक्का शिंदे गटाच्या रत्नागिरी तालुक्याच्या महिलाप्रमुख कांचन नागवेकर यांना बसला. गेली १० वर्षे त्यांनी गावपातळीवर चांगले काम केल्याचा दावा आहे. तरी त्यांना मतदारांनी नाकारले. गेली दहा वर्ष टेंभे ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी असतानाही त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला.

RELATED ARTICLES

Most Popular