24.8 C
Ratnagiri
Saturday, February 14, 2026

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...

काजिर्डा घाटरस्ता, सर्वेक्षणाला चालना एक कोटीची तरतूद

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

कोकण कन्या पाठोपाठ मांडवी एक्सप्रेसही खोळंबल्याने दादर स्थानकावर प्रवाशांचा संताप

मुंबईच्या दिशेने येणारी 'कोकण कन्या एक्सप्रेस' मार्गात...
HomeKhedखेडमध्ये तब्बल ३.५८ लाखांची ऑनलाईन फसवणूक

खेडमध्ये तब्बल ३.५८ लाखांची ऑनलाईन फसवणूक

मोबाईलवरील पे अँप चेक करीत असताना अज्ञाताने त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यामधुन परस्पर रक्कम ट्रान्सफर करुन फसवणुक केली.

मोबाईलवरील पे अँप तपासत असताना अज्ञाताने ३ लाख ५८ हजार रुपये संमती शिवाय ट्रान्सफर करुन घेवुन फसवणुक केल्याची घटना खेडमध्ये उघडकीस आली आहे. मंगळवार दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी श्रीमती तृप्ती प्रविणचंद्र सोनोने यांनी येथील पोलीसात फिर्याद दाखल केली. पोलीस कंट्रोल रुम कडुन प्राप्त झालेल्या एफआयआर नुसार फिर्यादी या आपल्या मोबाईलवरील पे अँप चेक करीत असताना अज्ञाताने त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यामधुन परस्पर २५ हजार, ३३ हजार, तसेच ३ वेळा १ लाख असे एकुण ३,५८,०००/- रुपयाची रक्कम ट्रान्सफर करुन फसवणुक केल्याची फिर्याद येथील पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

या प्रकरणी अज्ञाताविरोधात येथील पोलीस ठाण्यात भा.दं.वि. ४१९, ४२० सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क) (ड) अन्वये येथील पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तृप्ती प्रविणचंद्र सोनोने हिने अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दाखल करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणुकीच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular