26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeRatnagiriपावसामुळे शहरातील गटारे, रस्त्यांची दुरवस्था दुर्गंधीने नागरिक त्रस्त

पावसामुळे शहरातील गटारे, रस्त्यांची दुरवस्था दुर्गंधीने नागरिक त्रस्त

गटारांची कामे वेळेत न झाल्याने रस्त्यांची अवस्था बिकट आहे.

शहरातील रस्ते, गटारांच्या दुरवस्थेने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत. त्यात वळवाच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तर गटारे भरून वाहू लागल्यामुळे आरोग्याच्या समस्यांची भीती नागरिकांना भेडसावत आहे. काही ठिकाणी रस्ते, गटारांची कामे पालिकेच्या माध्यमातून सुरू असल्यामुळे तिथे पावसाने पाणी फेरले आहे. साळवी स्टॉप, ओसवालनगर, चर्च रोड येथील गटारांचे पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी (ता. २१) रात्री सुरू झालेल्या वादळी पावसाने दाणादाण उडवली.

गटारांची कामे वेळेत न झाल्याने रस्त्यांची अवस्था बिकट आहे. पावसाळ्यापूर्वी नियोजित कामे पूर्ण झाली नसल्यामुळे हे चित्र शहरातील काही भागांत दिसत होते. साळवी स्टॉप येथील कोकणनगर चौकात गटार बांधण्यात आले आहे. एका बाजूने ते पूर्ण झाले, पण एक बाजू तशीच आहे. तिथून पुढे मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सुरू असल्याने काल झालेल्या पावसाच्या पाण्यात खडी रस्त्यावर आली होती. पालिकेच्या माध्यमातून नळपाणी योजनेचे पाईप केव्हाही फुटतात. त्यामधून बाहेर पडणारे पाणी रस्त्यावर पसरते.

मात्र, साळवी स्टॉप येथे सकाळी पाणी सोडल्यानंतर पाईपमधून सतत वाहणाऱ्या पाण्यात झोपडपट्टीतील महिला कपडे धूत आहेत. याला पालिका जबाबदार असल्याचे नागरिकांचे मत आहे. शहरातील काही गटारांची बांधकामे पूर्ण झालेली नाहीत. त्या गटारांतून येणाऱ्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेळीच गटारांचे काम, रस्ते झाले असते तर आज ही दुरवस्था पाहायला मिळाली नसती, असे नागरिकांचे मत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular