गेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री ‘एकनाथ शिंदे यांनी रिफायनरीला विरोध केला असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारसु रिफायनरी करण्याचे जाहीर केले आहे. एकनाथ शिंदे यांनी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे. उद्योग मंत्री उदय सामंत, आ. किरण सामंत यांनीही विरोधाची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या बैठकीत काय निर्णय होईल हे सांगता येत नाही. कारण कोणत्याही राजकीय नेत्यावर अतिविश्वास टाकून जमणार नाही. नाणार आंदोलनापेक्षा बारसू आंदोलन मोठं उभारणार अशी घोषणा कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती अध्यक्ष अशोक वालम यांनी केली. कोकण रिफायनरी संघर्ष समिती यांच्या वतीने बारसू रिफायनरी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मुंबई दादर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी अशोक वालम बोलत होते. बारसू माती परीक्षण विरोधी आंदोलन स्थानिक जनतेने केले. त्याला आपणही विरोध करून सहभागी झालो. मात्र, ज्या पद्धतीने नाणार रिफायनरी विरोधी आंदोलन उभ राहिलं तसं बारसु आंदोलन उभ राहिलं नाही.
आपल्याला नाणार, बारसूपेक्षा कोकण वाचवायचं आहे. रिफायनरी सुरुवात झाली त्याला ९ वर्ष झाली. २०१७ पासून आंदोलन सुरु केलं. राजापूर, मुंबई, दिल्ली आंदोलन केलं. कोकण वाचवण्यासाठी कोकण वासियांची तळमळ आंदोलनात दिसून आली. आंदोलनाची राज्य, केंद्र सरकारला धडकी भरली. सरकारचा प्रत्येक डाव उलटून लावला. प्रत्येक आंदोलनात महिलांचा सहभाग मोठा होता. ती जिद्द आजही लोकांच्या मनात आहे, आंदोलन ९ वर्ष झाले. आंदोलनाची तीव्रता कमी झाली तरी लोकांचे रिफायनरी समर्थन वाढलेले नाही तर दिवसेंदिवस रिफायनरी बाबत जनजागृती होऊन विरोध वाढत आहे. नाणार रिफायनरी आंदोलनाच्या वेळी राजापूर तालुक्यातील १७ गावी होती आता आपल्या आंदोलनात कोकणातून प्रतिसाद मिळणार आहे. बळीराज सेना सरचिटणीस नंदकुमार मोहिते यांच्या निधनाचा दुखावटा पाळला असल्याने तेरा दिवसा नंतर जाहीर मिटिंग घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. आंदोलनात प्रत्येकानी सहभाग घेतला तर कोकणावर आलेले रिफायनरीचे संकट घालवण्यास वेळ लागणार नाही असेही त्यांनी सांगिले.