26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeRatnagiriभाजपच्या शक्तिप्रदर्शनाने शिवसेनेत चलबिचल

भाजपच्या शक्तिप्रदर्शनाने शिवसेनेत चलबिचल

भाजपने आज रत्नगिरीत प्रथमच केलेल्या शक्तिप्रदर्शनाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत चलबिचल सुरू आहे. ६० वर्षांचे स्वप्न पूर्ण होणार, भाजपचा कोकणातील वनवास संपणार या भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यांनी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील सूचक विधानाने ही जागा भाजपच्या पारड्यात पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा महायुतीचा तिढा काही सुटण्याचे नाव घेईना. एकदा उमेदवारीचे पारडे शिवसेनेकडे तर एकदा भाजपकडे झुकत आहे. शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांचे नाव निश्चित होत असताना आज भाजपच्या रत्नागिरीतील मेळाव्याने चित्र पुन्हा बदलले आहे.

भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करून या मतदारसंघात ताकद असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. भाजपचे लोकसभा प्रभारी अतुल काळसेकर यांनी तर थेट या जागेच्या विषयावर भाष्य करत भाजपला ही जागा मिळाली आहे. नारायण राणे याचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर माजी आमदार प्रमोद जठार यांनीही ६० वर्षांचे भाजपचे स्वप्न पूर्ण होणार, असे स्पष्ट केले. नितेश राणे यांनी वनवास संपणार आणि नीलेश राणे यांनी आपलाच गुलाल उधळणार असे वक्तव्य केल्याने ही जागा भाजपकडे जाणार असे चित्र तयार झाले आहे.

उमेदवारी मिळाल्यास लढणार आणि जिंकणारही – सायंकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या विषयाला पूर्णविरामच दिला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपचाच आहे. भाजपचाच उमेदवार येथून लढेल. कोण उमेदवार ते पक्ष ठरवेल; परंतु कोणी यात लुडबुड करू नये. मी उमेदवारी मागायला गेलो नाही; पण माझे नाव जाहीर केल्यास लढणार आणि जिंकणारही, असे स्पष्ट केले. त्यामुळे भाजपचा उमेदवार निश्चित झाल्याचे चित्र आहे. यामुळे या मतदरासंघावर दावा करणाऱ्या शिवसेनेमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular