30.5 C
Ratnagiri
Sunday, April 21, 2024

लोकसभेत लीड दिले, तरच विधानसभेची उमेदवारी – भाजपची भूमिका

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने दिलेल्या 'उमेदवारांना विद्यमान आमदारांनी...

रत्नागिरी मांडवी किनारी महाकाय मृत व्हेल मासा

शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत...
HomeRatnagiriकोकण प्रादेशिक पक्षाचा एसटीतून प्रचार, थेट लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

कोकण प्रादेशिक पक्षाचा एसटीतून प्रचार, थेट लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

अनेक गावांतील कट्ट्यावरही प्रचारासाठी जात आहेत.

लोकसभा निवडणूक प्रचार रंगू लागला आहे. प्रथमच लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या कोकण प्रादेशिक पक्षाने प्रचाराचे रणशिंग फुंकले असून, त्यांनी प्रचाराचा वेगळा फंडा अवलंबत ते एसटीमधून फिरत आहेत. गावागावातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला असून, अनेक गावांतील कट्ट्यावरही प्रचारासाठी जात आहेत. तिथे जाऊन मतदारांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये अॅड. ओवेस पेचकर यांची ओळख आहे. कोकणच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती नाही. त्यासाठी जनतेला पर्याय देऊन कोकणच्या विकासासाठी झटण्यासाठी कोकण प्रादेशिक पक्षाची स्थापना केल्याचे अॅड. पेचकर यांनी जाहीर केले होते.

पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे सांगितले. कोकणच्या चार ते पाच जागांवर हा पक्ष उमेदवार देणार आहे. जाहीर प्रचार, मोठ्या सभा नाहीत किंवा पोस्टरबाजी न करता प्रचाराचा वेगळा फंडा त्यांनी अवलंबला आहे. पक्षाचे संस्थापक ओवेस पेचकर आणि रत्नागिरी- सिंधुदुर्गचे उमेदवार शकील सावंत हे गावागावांत एसटी बसमधून प्रचारासाठी फिरत आहेत. मतदारांशी चर्चा करून गांवातील आणि जिल्ह्यातील प्रश्नांवर ते चर्चा करतात. आम्ही कशासाठी निवडणूक रिंगणात उतरलो हा उद्देशही सांगतात. निवडणूक हा आमचा व्यावसाय नाही.

जनतेचे प्रश्न सुटावेत, कोकणचा विकास व्हावा, रोजगार मिळावा, उद्योग यावेत या उद्देशाने निवडणुकीत उतरलो असल्याचे ते पटवून देत आहेत. एसटीमधील प्रचारानंतर गावागावात असलेल्या कट्ट्यावर ते लोकांशी थेट संवाद साधत आहेत. लोकांशी हितगूज करत त्यांचा कल घेत आहेत. उमेदवार मतदान झाल्यानंतर पुन्हा पाच वर्षांनीच उगवतात, असे काही मतदारांनी मत मांडल्याचे शकील सावंत यांनी सांगितले. कोकण प्रादेशिक पक्षाने या निवडणुकीत थेट मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रचाराचा वेगळा फंडा अवलंबला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular