27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeMaharashtraशून्य सावली दिवस

शून्य सावली दिवस

मध्यान्हाला सूर्य डोक्यावर आल्यावर आपली सावली बरोबर पायाखाली आल्यामुळे दिसू शकत नाही म्हणून या दिवसांना ‘ शून्य सावलीचा दिवस ‘ म्हणतात.

एखाद्या व्यक्तीने आपली साथ सोडली तरी अशी एक गोष्ट आहे जी आपली कधीच साथ सोडत नाही. ती म्हणजे आपली सावली. परंतु, वैज्ञानिक दृष्ट्या शून्य सावली दिवस देखील आपल्याला अनुभवता येणार आहे. सोमवार दि. १६ मे रोजी मुंबईकरांना आणि मंगळवार दि. १७ मे रोजी ठाणे डोंबिवलीकरांना दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी शून्य सावलीचा अनुभव घेता येणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे.

या बाबत अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की आपली सावली कधीही आपली साथ सोडीत नाही, असे म्हटले जात असले तरी ते शंभर टक्के सत्य असतेच असे नाही. वर्षातील असे दोन दिवस असतात की ज्या दिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून जाऊ शकते. या दिवसांना ‘शून्य सावली दिवस’ असे म्हणतात. जाणून घेऊया या शून्य सावलीच्या दिवसाचे रहस्य.

शून्य सावलीचा हा अनुभव उत्तर गोलार्धातील कर्क वृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकर वृत्त यामधील प्रदेशातूनच घेता येऊ शकतो. निरभ्र आकाशात सूर्य असताना मोकळ्या जागेवर उन्हात आपण उभे राहिलो तर जमिनीवर आपली सावली पडलेली दिसते. सूर्योदयावेळी सूर्य पूर्व क्षितिजावर असताना आपली सावली जास्त लांबीची पडलेली दिसते. सूर्य जसजसा वर सरकू लागतो,  तशी आपल्या सावलीची लांबी कमी कमी होत जाते. नंतर सूर्य जसजसा पश्चिम क्षितिजाकडे जाऊ लागतो तसतशी आपल्या सावलीची लांबी पुन्हा वाढताना दिसते.

वर्षातील दोन दिवस वगळता भर दुपारीही सूर्य आकाशात नेमका आपल्या डोक्यावर न आल्याने भर दुपारीही आपली थोडीतरी सावली दिसतच असते. वर्षातील दोन दिवशी भर दुपारी सूर्य आकाशात आल्याने आपल्या डोक्यावर आपली सावली नेमकी पायाशी आल्यामुळे आपणास ती दिसू शकत नाही. त्यामुळे या ठराविक दोन दिवशीच आपणास शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. मध्यान्हाला सूर्य डोक्यावर आल्यावर आपली सावली बरोबर पायाखाली आल्यामुळे दिसू शकत नाही म्हणून या दिवसांना ‘ शून्य सावलीचा दिवस ‘ म्हणतात.

RELATED ARTICLES

Most Popular