24.6 C
Ratnagiri
Thursday, December 26, 2024
HomeKhedसह्याद्री व्याघ्र प्रकल्पात फुलपाखरांच्या ९८ प्रजाती

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात फुलपाखरांच्या ९८ प्रजाती

एक भाग म्हणून तीन टप्प्यांत फुलपाखरू सर्वेक्षण सुरू केले आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून फुलपाखरांच्या ९८ प्रजातींची नोंद झाली आहे. पर्यावरण चळवळीत काम करणाऱ्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. सर्वेक्षण लोकसहभागातून करण्यात आले. सुमारे ४० जणांनी सर्वेक्षणात भाग घेतला. त्यासाठी जंगलात पदयात्रा काढली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील (एसटीआर) जैवविविधतेची गुंतागुंतीची टेपेस्ट्री उलगडण्याचे प्रयत्न वनविभागाने सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तीन टप्प्यांत फुलपाखरू सर्वेक्षण सुरू केले आहे. यात दोन सर्वेक्षणांच्या आकडेवारीवरून ९८ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.

सातारा (महाबळेश्वर, मेढा, सातारा आणि पाटण तहसील), सांगली (शिराळा तहसील), कोल्हापूर (शौवाडी) आणि रत्नागिरी (संगमेश्वर, चिपळूण आणि खेड तहसील) या चार जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात (एसटीआर) फुलपाखरे मोजण्याचा प्रयत्न महाराष्ट्र वनविभागाने प्रथमच केला. फुलपाखरू सर्वेक्षण हा सह्याद्रीतील पहिला उपक्रम आहे आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील तीन टप्यातील फुलपाखरू सर्वेक्षण हा एक मोठा विषय आहे. जैवविविधता समजून घेणे आणि जतन करणे. फुलपाखरे हे पर्यावरणीय आरोग्याचे सूचक आहेत आणि त्यांचे संवर्धन हे या परिसंस्थेच्या सर्वांगीण कल्याणासाठी आवश्यक असल्याने हा उपक्रम घेतल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रजातींची नोंद – मलबार बँडेड पीकॉक, तमिळ लेसविंग आणि क्रिमसन रोज या दुर्मिळ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. ब्लू मॉर्मन, मलबार बॅन्डेड पीकॉक, कॉमन मॅप ही फुलपाखरे सर्वाधिक आहेत. त्यानंतर चॉकलेट पॅन्सी, लेमन पॅन्सी, ब्लू पॅन्सी यांचा क्रमांक लागतो.

सर्वेक्षणाचे उद्दिष्ट – या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट फुलपाखरांच्या प्रजाती, त्यांचे अधिवास आणि पश्चिम घाटाच्या हिरवळीच्या प्रदेशात फुलपाखरांच्या संख्येवर परिणाम करणारे घटक यांची व्यापक माहिती जमा करणे आहे. या सर्वेक्षणात आढळलेल्या प्रजातींची संपूर्ण संख्या उघड करण्यात आलेली नाही.

RELATED ARTICLES

Most Popular