27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeKhedचाकरमानी येणार कशेडी बोगद्यातून, एकेरी वाहतूक सुरू

चाकरमानी येणार कशेडी बोगद्यातून, एकेरी वाहतूक सुरू

चाकरमानी व पर्यटक यांचा वेळ वाचेल आणि प्रवासात येणारा थकवाही कमी होणार आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या बोगद्याच्या एका लेनमधून वाहतूक सुरू झाल्याने गणेशभक्तांतून आनंद व्यक्त होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अवघड असलेल्या कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या बोगद्यातून लहान वाहनांची वाहतूक आजपासून (ता. ११) सुरू झाली.

या बोगद्यामुळे घाटातील प्रवासाचे अंतर सुमारे पाऊण तास कमी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे रहदारी आणि अपघाताचे प्रमाणदेखील यामुळे घटणार आहे. चाकरमानी व पर्यटक यांचा वेळ वाचेल आणि प्रवासात येणारा थकवाही कमी होणार आहे. कोकणवासीयांसह पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या बोगद्यातून वाहतूक अखेर सुरू झाल्याने गणेशभक्तांतून आनंद व्यक्त होत आहे.

दहा मिनिटांत घाट पार ! – डिसेंबर २०१८ मध्ये या बोगद्याचे काम सुरू करण्यात आले. कशेडी घाट रस्ता हे साधारण १४ किलोमीटरचे अंतर आहे. हे अंतर पार करण्यासाठी ४० ते ४५ मिनिटे लागतात. अवघड वळणे आणि अरुंद रस्ता, त्यात बाजूला खोल दरी. यामुळे प्रवास करणे जिकिरीचे असते. आता बोगद्यामधून प्रवास हा अधिक सोयीचा होणार आहे. जोडरस्ता ७ किलोमीटर व बोगदा २ किलोमीटर असा एकूण ९ किलोमीटरचा प्रवास होणार असून हे अंतर केवळ दहा मिनिटांमध्ये पार करता येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular