26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeRatnagiriनारळाच्या झाडाच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती शक्य

नारळाच्या झाडाच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती शक्य

नारळ झाडांचे एकत्रीकरण करून नारळापासून मूल्यवर्धित उत्पादनांचे जागतिक दर्जाचा महाराष्ट्रातील पहिला प्रक्रिया उद्योग रत्नागिरी तालुक्यात उभारला जाणार आहे.

नारळाच्या झाडाच्या व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील हजारो युवकांना व महिलांना रोजगार देण्याची योजना स्वराज्य अॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीने आखल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष तुषार आग्रे यांनी आज ५ एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नारळधारक आहेत. जुलै २०१७ मध्ये स्वराज्य एंटरप्रायझेसचे रूपांतर स्वराज्य अॅग्रो अँड अलाइड सर्विसेस प्रा. लि. या कंपनीमध्ये झाले. ही कंपनी २०१५ पासून रत्नागिरी शहरातील नारळ झाडांच्या व्यवस्थापनाचे आणि नारळ वृक्षाच्या सर्व भागांवरील मूल्यवर्धनाचे कार्य करते.

श्री. आग्रे म्हणाले की, पहिल्या टप्प्यात नारळाच्या झाडाच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून विखुरलेल्या नारळ झाडांचे एकत्रीकरण करून नारळापासून मूल्यवर्धित उत्पादनांचे जागतिक दर्जाचा महाराष्ट्रातील पहिला प्रक्रिया उद्योग रत्नागिरी तालुक्यात उभारला जाणार आहे. त्यातून ३२३३ रोजगारांची निर्मिती होऊ शकते. यासाठी कोणाची जमीन संपादित करायची गरज नाही. शिवाय मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या लागवडीमुळे या प्रकल्पाद्वारे कोकणाच्या आकर्षकतेत भर पडेल. हा प्रकल्प हरित प्रकल्पांपैकी एक असेल.

श्री. आग्रे म्हणाले, गेल्या १० वर्षांत नारळाच्या एका झाडापासून शेतकऱ्यांना सुमारे एकूण १० हजार ते १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असेल. पण कंपनीच्या व्यवस्थापनाच्या प्रणालीत आल्यावर शेतकऱ्यांना पुढील १० वर्षांत साधारणत: एका झाडापासून एकूण ७७,५०० रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळू शकते.

झाडावर चढणाऱ्या कुशल कामगारांचा अभाव, नारळ लागवडीबददल तांत्रिकदृष्ट्या अज्ञान, खत आणि पाण्याच्या योग्य नियोजनाचा अभाव, कीड आणि रोग व्यवस्थापनाचा अभाव, नारळ फळाचा लहान झालेला आकार,  इरिओफाइड कोळी, कोंब कुजवा रोग, परिणामी कमी झालेली उत्पादन क्षमता, नारळ उत्पादनाची अनिश्चितता, योग्य दर न मिळणे अशा या समस्या आहेत.

या सर्वांवर उपाय म्हणून कल्पवृक्ष सुरक्षा मित्र ही देशातील पहिली संकल्पना स्वराज्य एंटरप्रायझेसच्या माध्यमातून १ जानेवारी २०१५ पासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू केली. आता त्याचा विस्तार करण्यात आला आहे. त्यांच्या वृक्षांची नोंदणी करून पुढे मूल्यवर्धनाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया उपक्रमात कंपनी मोठ्या प्रमाणात कार्य करू इच्छिते. त्यातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. केरळच्या धर्तीवर नारळ आणि नारळ झाडापासुन विविध वस्तू निर्मिती प्रकल्प उभे राहू शकतील. नारळ झाडांच्या नोंदणीसाठी रत्नागिरी तालुक्यातील तरुण, महिला आणि बचत गटांचे सहकार्य अपेक्षित असून त्यातून त्यांना रोजगार मिळणार आहे

RELATED ARTICLES

Most Popular