28.5 C
Ratnagiri
Saturday, November 23, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKhedभोस्ते घाटातील संरक्षक भिंतीची पडझड…

भोस्ते घाटातील संरक्षक भिंतीची पडझड…

अवजड वाहतुकीची वाहने थेट संरक्षक भिंतीवर आदळत असल्याने भिंतीची नासधूस होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळण अपघातांच्या दृष्टीने शापित बनले आहे. वळणावर अवजड वाहतुकीच्या वाहनांना घडणाऱ्या अपघातांची मालिका अजूनही सुरू आहे. सततच्या अपघातांमुळे घाटातील अवघड वळणावरील संरक्षक भिंत ढासळत चालली आहे. यामुळे वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. संरक्षक भिंतीला धक्का पोहोचल्यास वळणावरून वाहने हाकणे जिकिरीचे बनणार आहे. राष्ट्रीय महामार्ग खाते अजूनही सुस्त असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भोस्ते घाटातील चौपदरीकरणानंतर वाहनचालकांचा प्रवास वेगात होत असला तरी अवघड वळणावर सतत घडणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. वळणावरील अपघातांची मालिका रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून आजवर नानाविध उपाययोजनांचा अवलंब करूनही सारे प्रयत्न फोल ठरले आहेत.

टायर तंत्रज्ञानाचा अवलंब करूनही अपघात थांबलेले नाहीत. चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर अवजड वाहतुकीची वाहने थेट संरक्षक भिंतीवर आदळत असल्याने भिंतीची नासधूस होत आहे. सततच्या अपघातांमुळे संरक्षक भिंत ढासळली आहे. मध्यभागी संरक्षक भिंतीला पडलेले भगदाड अवजड वाहतुकीच्या वाहनांसह अन्य वाहनांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. एकीकडे संरक्षक भिंत ढासळत असतानाही त्याठिकाणी उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने अजूनही ठोस पावले उचलेली नाहीत. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

गतिरोधकांसह टायर तंत्रज्ञान कुचकामी – भोस्ते घाटातील अवघड वळणावरील अपघात रोखण्यासह वाहनांच्या वेगाला लगाम घालण्यासाठी १५ गतिरोधक बसवण्यात आले आहेत. यातील ७ ते ८ गतिरोधक मध्यभागीच उखडले आहेत. संरक्षक भिंतीवर २० हून अधिक टायर बसवून टायर तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला होता. त्यातील अवघे ५ टायरच संरक्षक भिंतीवर शिल्लक आहेत. यामुळे गतिरोधकांसह टायर तंत्रज्ञान कुचकामी ठरले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular