25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeRatnagiriलांजा, संगमेश्वरला पावसाचा तडाखा...

लांजा, संगमेश्वरला पावसाचा तडाखा…

विजा आणि गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे कापणी सुरू असलेल्या शेतात पाणी झाले आहे.

सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने लांजा व संगमेश्वर तालुक्याला तडाखा बसला आहे. शुक्रवारीही संगमेश्वरात धामणी, गोळवलीत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. लांजा तालुक्यातील भांबेड बाजारपेठेतील दोन घरांचे सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच संगमेश्वर खाडी पट्ट्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळून वीज पुरवठा खंडित झालेला आहे. या पावसामुळे दिवसभर कापून ठेवलेले भात भिजून गेल्यामुळे नुकसान झाले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली होती. मात्र बुधवारपासून सलग दोन दिवस सायंकाळच्या अचानकपणे वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. संपूर्ण तालुक्यात हा पाऊस कोसळला असला तरीही भांबेड, पेठदेव बाजारपेठेला वादळाचा तडाखा बसला. वेगवान वाऱ्यामुळे दोन घरांवरील असलेले सिमेंट पत्रे आणि छपरांची कौले उडून गेली.

यामध्ये शैलजा जयराम गांधी यांच्या घराचे १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच विलास परब यांच्या घराचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा भांबेड मंडळ अधिकारी मराठे तसेच कोतवाल विजय दळवी यांनी केला. संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी, प्रिंदवणे, फुणगुस, कोंडये परिसरात जोरदार पाऊस झाला. गुरुवारी (ता. ३१ ऑक्टोबर) रात्री ७.३० वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी साचलेले होते. कापलेली भातशेती वाहून गेली आहेत. डिंगणीमधील काष्टेवाडी येथील पाईपलाईन तुटले असून विजेचे खांबही पडलेले आहेत. रस्त्याशेजारील झाडे पडून डिंगणीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. जाधववाडी येथील माधव जाधव यांच्या घराच्या मंडपाचे छप्पर उडाले. डिंगणी आगरवाडी, खाडेवाडी येथे खांब पडले असून विद्युत प्रवाह खंडित झाला आहे.

खाडी भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. खाडी पट्ट्यातील वीज पुरवठा खंडित झाल्याने ऐन दिवाळीत रोषणाई करता आलेली नाही. तसेच जाकादेवी परिसरातही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज सायंकाळी दुपारनंतर धामणी आणि गोळवली परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वेगवान वारेही वाहत होते. त्याचा फटका भात शेतीला बसणार आहे.

साखरप्यात शेतीला फटका – साखरपा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साखरपा गाव आणि परिसरात मुसळधार पाऊस पडला. विजा आणि गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे कापणी सुरू असलेल्या शेतात पाणी झाले आहे. आधीच चित्रा नक्षत्रात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यातच गुरुवारी पडलेल्या पावसाने त्यात भर घातली आहे. अनेक ठिकाणी भातशेती चिखलात आडवी झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular