28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

पेठमाप-मुरादपूर पुलाचे काम पुन्हा जोमाने सुरु…

चिपळूण शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वाहतुकीवर उत्तम...

ना. उदय सामंतांचा रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केला अभूतपूर्व सत्कार

रत्नागिरीचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. उदय...

चिपळुणात शेतकऱ्यांचे १८०० अर्ज झाले बाद

पीएम किसान व नमो सन्मान योजनेच्या नवीन...
HomeRatnagiriरत्नागिरीत २४५ बोअरवेलला मंजुरी, मंत्री उदय सामंत यांचा पुढाकार

रत्नागिरीत २४५ बोअरवेलला मंजुरी, मंत्री उदय सामंत यांचा पुढाकार

शहरातील सोसायटीधारकांना दिलासा देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मागेल त्याला बोअरवेल आणि मागेल त्याला वेदरशेड (टेरेसवर छप्पर) ही नवी योजना जाहीर केली. याचा थेट सोसायटीतील सदस्यांना फायदा होणार असला तरी ही आगामी निवडणुकीची बेगमी मानली जात आहे. शिंदे शिवसेनेने एका दगडात दोन पक्षी मारले असले तरी आगामी काळात भूगर्भातील पाणीपातळी समतोल ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी अडवून जिरवण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे. त्यावर मात करण्यासाठी पालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. तरी शहरात मोठ्या प्रमाणात पालिकेमार्फत पाणी टँकरने पुरवले जात आहे.

या सर्वांवर मात करण्यासाठी आणि शहरातील सर्व सोसायट्या पाणीदार करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आयसीआयसीआय बँकेच्या सीएसआर फंडातून शहराला २५० बोअरवेल मारण्याचा निर्णय घेतला आहे. मागेल त्याला बोअरवेल आणि मागेल त्याला वेदरशेड देण्यात येत आहे. उद्योगमंत्री सामंत आणि सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या पुढाकाराने आयसीआयसीआय बँक यांच्या सीएसआर फंडातून रत्नागिरी शहरात अडीचशे बोअरवेल घेतल्या आहेत. एवढेच नाही तर मागेल त्याला वेदरशेडही दिली जात आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीमध्ये शहरातील काही नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सामंत यांच्यासमोर मांडला होता. काही गृहनिर्माण सोसायटीमध्ये बोअरवेलची आवश्यकता असल्याची मागणी होती. त्या वेळेस त्यांनी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. सामंत यांनी सोसायटीधारकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. सोसायट्या पाणीदार करण्यासाठी मागेल त्याला बोअरवेल आणि वेदरशेड देण्यात येत असून, त्याची सुरुवात झाली असून आतापर्यंत दहाच्यावर बोअरवेल मारण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सोसायट्यांचा पाणीप्रश्न सुटला आहे. टेरेस गळतीचा प्रश्न सोडवण्यासाठी वेदरशेडही मारून देण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular