27.6 C
Ratnagiri
Friday, March 14, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeRatnagiriसाहेबांनू अधीमधी अशी भेट घ्या रत्नागिरीची

साहेबांनू अधीमधी अशी भेट घ्या रत्नागिरीची

रत्नागिरी कोरोना व्हायरसच्या विळख्यामध्ये एवढी अडकत चालली आहे, एवढ्या उपाययोजना केंद्र आणि जिल्हा शासन करत असून सुद्धा कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर काही कमी येताना दिसत नाही. दररोजच्या संक्रमितामध्ये कमालीची वाढ झालेली दिसून येते, रोज ५०० च्या वर संक्रमित संख्या, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सुद्धा काही कमी नाही. जिथे गेली वर्षभर यंत्रणा “उपाययोजना” राबवत आहे, तरी कोरोना महामारीचा प्रभाव काही कमी होत नाही. त्यामुळे रत्नागिरीवर “उपाय” करण्यासाठी सरळ मंत्री महोदय २१ जून रोजी रत्नागिरीमध्ये येणार आहेत.

चिपळूणचे कृतीशील आम. शेखर निकम यांनी रत्नागिरीच्या झालेल्या भयानक अवस्थेबद्दल उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांना मंत्रालयामध्ये प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर सांगितले. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर सारख्या मोठ्या ठिकाणांची परिस्थिती जर आटोक्यात येत असेल तर रत्नागिरीमध्ये कोणतेच उपाय लागू कसे होत नाहीत? गेले २ महिने केले गेलेले कडक लॉकडाऊन मुळे कोरोना काही होरपळला नाही, मात्र या सततच्या निर्बंधाने सामान्य जनता मात्र चांगलीच होरपळून निघाली आहे.

मंत्री महोदयांच्या दौऱ्याची सकारात्मकता

रत्नागिरीबद्द्ल इत्यंभूत माहिती ऐकल्यावर मंत्री महोदयांनी रत्नागिरीसाठी “उपाय” शोधण्यासाठी तत्काळ येत्या सोमवारी दौरा जाहीर केला. उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांचा दौरा जाहीर होताच शासकीय कामकाजामध्ये कमालीचा वेग निर्माण झाला असून, कोरोना चाचण्यांना वेग आला, लसीकरण वेगाने होण्यासाठी आणि कोरोनावर विशेष उपाययोजना करण्यासाठी ४ तज्ञ डॉक्टरांची रत्नागिरीमध्ये रुजू झाल्याचे वृत्त थडकले, बदली सत्र सुरु झाले, गेले २ महिने रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी रेट कमी येत नव्हता, तो एकदम दौरा जाहीर झाल्यापासून १० टक्क्यापेक्षा खाली उतरला. नक्की हि मंत्री महोदयांच्या दौऱ्याची सकारात्मकता म्हणायची कि कसे काय !

covid test

उप मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला कोरोना निर्बंधासाठी आजपर्यंत केलेल्या सर्व “उपाययोजनेचा” लेखाजोखा तयार ठेवण्यास सांगितला आहे. त्यामुळे प्रशासनाचा कारभार किती स्पष्ट आहे हे सर्वांच्याच ध्यानात येईल. मंत्र्यांचा आगामी दौऱ्याच्या घोषणेमुळे जर एवढा सकारात्मक बदल घडत असेल तर, “साहेबांनू अधी मधी अशीच भेट घ्या रत्नागिरीची”, अशी कुजबुज जनतेमध्ये सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular