23.1 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriआधुनिक यंत्राचे भाडे परवडेना, पारंपारिक शेतीचं बरी

आधुनिक यंत्राचे भाडे परवडेना, पारंपारिक शेतीचं बरी

कोकणामध्ये सध्या शेतीचा हंगाम सुरु झाल्याने आणि पावसाची कृपादृष्टी चांगल्या प्रकारे असल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. प्रत्येक ठिकाणच्या शेतीच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. हल्ली शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करताना दिसतो. तर काही ठिकाणी अजूनही पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते.

मागील वर्षापासून भेडसावत असलेली कोरोनाची समस्या आणि सततच्या पण गरजेच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. लॉकडाऊनमुळे वायफळ खर्च जरी कमी झाला असला तरी, उद्योग धंदे ठप्प झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. शेतीचा हंगाम आला तरी, शेतकऱ्याची अवजारे, खते, बियाणी यांची जमवाजमव अजून सुरूच आहे. आर्थिक दृष्ट्या अस्थैर्य असल्याने आणि आधुनिक पद्धतीच्या यांत्रिकीकरणाचा खर्च परवडत नसल्याने दापोलीमधील काही कुटुंबे कुदळीच्या सहाय्याने शेती करत आहेत. शेती नांगरणीसाठी वापरला जाणारा आधुनिक पॉवर ट्रीलरचे भाडे सुद्धा शेतकर्यांना परवडणारे नसल्याने आणि शेती सुद्धा बिनभरवशाची झाली असल्याने त्यातून किती उत्पन्न मिळेल! याबद्दल साशंक असल्याने स्थानिक शेतकरी आपली पारंपारिक शेतपद्धतच बरी असे म्हणू लागले आहेत.

दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या तंत्रशाखेतून, शेतकर्यांना शेतीसाठी आवश्यक असणारी अवजारे, यंत्रे भाडे तत्वावर पुरवली जातात. परंतु, इंधनाच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या गगनभेदी किमती पाहून यंत्रे भाड्याच्या किमतीमध्ये सुद्धा घेणे शेतकरी वर्गाला अशक्यप्राय झाले आहे. त्यातच कोरोनामुळे अनेक जण बेरोजगार झाले असल्याने आर्थिक पाठबळाची वानवाच आहे. कोकण कृषी विद्यापीठ मुख्यालय हे दापोली तालुक्यातच स्थित असल्याने या विद्यापीठाच्या तंत्रज्ञान शाखेने छोट्या शेतकऱ्यांना या कुदळ मारण्याच्या त्रासातून मुक्ती मिळण्यासाठी एखादे आर्थिकदृष्ट्या परवडणारे यंत्र तयार करून दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular