25.2 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeKhedखेडच्या भोस्ते घाटात मृतदेह, तो स्वप्नात येऊन सांगतोय की मदत करा !

खेडच्या भोस्ते घाटात मृतदेह, तो स्वप्नात येऊन सांगतोय की मदत करा !

ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलिसांनी सुरु केला आहे.

रत्नागिरीतील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा सापळा आणि कवटी तसेच झाडाच्या फांदीवरती लोंबकळणारी दोरी बुधवारी संध्याकाळी सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील एका व्यक्तीला या ठिकाणी मृतदेह असल्याचे स्वप्न पडले, त्याने ते खेड पोलिसाना सांगितले. त्यावरुन हा रहस्यमय सापळा आणि कवटीचे गूढ उकलले आहे. अशाच प्रकारची एक नोंद पोलिसांच्या एफआयआर मध्ये सुद्धा करण्यात आली आहे.

वारंवार पडत होती स्वप्न – पोलिसांच्या एफआयआर नुसार, १७ सप्टेंबर २०२४ रोजी योगेश पिंपळ आर्या (३०) ही सिंधुदुर्ग येथील राहणारी स्थानकात जिल्ह्यातील सावंतवाडी आजगाव येथे व्यक्ती खेड पोलीस दाखल झाली. त्याने पोलिसांना सांगितले की, ‘मला वारंवार स्वप्न पडतात. त्यामध्ये खेड रेल्वे स्टेशनसमोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असल्याचं दिसतं. तो पुरुष माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा असे सांगत आहे.’

खळबळजनक खुलासा – योगेश यांच्या बोलण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवत या भागाची तपासणी सुरु केली. पोलिसांच्या या तपासणीदरम्यान त्यांना भोस्ते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्यासारखा वास येत होता. पोलिसांनी जवळ जाऊन पाहिले असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर व प्लास्टिकच्या पट्टया बांधलेले व टॉवेलने बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेतील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला. हा मृतदेह झाडाला बांधलेल्या अवस्थेत खाली पडलेला दिसला. अंगावर राखाडी रंगाचे जॅकेट, राखाडी रंगाची पँट होती. अनेक दिवसांपासून हा मृतदेह इथे असल्याचं त्याच्या सापळ्यावरुन झालं. स्पष्ट

आत्महत्या की घातपात ? – या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची ‘आदिदास’ असं लिहिलेली सॅक आढळून आली. या मृतदेहापासून ५ फुटांवर एक कवटी सापडली. तर मृतदेहाच्या दोन्ही ढोपराजवळ ‘ए.आय.आर’ कंपनीचे काळ्या रंगाचे बूट सापडले. मात्र मृतदेहाजवळ सापडलेल्या सॅकमध्ये पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच ओळखपत्र किंवा पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलिसांनी सुरु केला आहे.

स्थानिकांना कल्पना नाही – या मृतदेहाची अवस्था पाहता तो बरेच दिवसांपासून इथेच अस ावा असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. इतक्या दिवस या ठिकाणी हा मृतदेह असताना आणि दुर्गंधी पसरली असताना त्याबद्दल स्थानिकांना काहीही कल्पना नसून थेट सावंतवाडीतील एका युवकाला स्वप्नात या मृतदेहासंदर्भातील माहिती मिळाली, हे सर्वांनाच चक्रावून टाकणारं आहे. आता या प्रकरणामध्ये पोलीस कसा तपास करतात? हा मृतदेह कोणाचा आहे हे कधीपर्यंत समोर येणार याबद्दल स्थानिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. ही बाब ही गोष्ट विचार करायला लावण- ारी, अचंबित करणारी आणि तितकीच खळबळजनक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकरणाचे गूढ पोलिसांना उलगडावे लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular