28 C
Ratnagiri
Friday, June 13, 2025

रत्नदुर्गाच्या बुरूज परिसरात अतिक्रमण…

रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्याचा टेहळणी बुरूज पेठकिल्ला...

शिक्षकांना प्रशिक्षणात अपमानास्पद वागणूक – संभाजी थोरात

राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये प्रथमच...

कृषी विद्यापीठाचा ई-मेल हॅक करून फसवणूक

येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या...
HomeRatnagiriजगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जन्मोत्सवदिनी १० रुग्णवाहिकांचे लोकार्पण

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जन्मोत्सवदिनी १० रुग्णवाहिकांचे लोकार्पण

अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार सुरू करण्यासाठी त्यांना रुग्णवाहिकांतून रुग्णालयात पोहोचवण्याचा हा उपक्रम आहे.

श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू राम नंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा २१ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमानीं साजरा होत आहे. या दिवशी संस्थानतर्फे आखणी १० रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्याची जोरदार तयारी सुंदरगडावर सुरू आहे. दरवर्षी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जन्मोत्सव त्यांच्या भाविकांतर्फे, उत्साहात साजरा केला जातो.

यावर्षीही २१ ऑक्टोबरला जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून सुंदरगडावर लाखो भाविक येत असतात. दिवसभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. त्यांच्या अमृतमय प्रवचनाने सोहळ्याचा समारोप होतो. जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्याजी महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आणखी १० रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

मोफत रुग्णवाहिका – संस्थानच्या अनेक उपक्रमापैकी अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार सुरू करण्यासाठी त्यांना रुग्णवाहिकांतून रुग्णालयात पोहोचवण्याचा हा उपक्रम आहे. ही मूळ कल्पना जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांना सुचली आहे. आता एकूण रुग्णवाहिकांची संख्या संख्या ५२ होणार आहे. दरम्यान जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या वाढदिवसाची तयारी सुंदरगडावर जोरात सुरू आहे. या दिवशी अनेक धार्मिक कार्यक्रम असणार आहेत. यावेळी नाशिक, परभणी व मुंबई येथून ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश देत वसुंधरा दिंड्या निघाल्या आहेत. त्या जन्मोत्सवदिनी नाणीज येथे २१ ऑक्टोबरला सुंदरगडावर पोहोचणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular