27.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriनाट्यगृहातील त्रुटी दूर केल्या जातील: सामंत

नाट्यगृहातील त्रुटी दूर केल्या जातील: सामंत

अभिनेते भरत जाधव यांनी या गोष्टीचे नाहक भांडवल केले, त्यांनी इव्हेंट करायचा की एपिसोड करायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. मी इकडे येणार नाही, मी तिकडे येणार , नाही, असं होत नाही. ते न आल्यामुळे सांस्कृतिक चळवळ कधी थांबणार नाही, असे सुनावताना नाट्यगृहात त्रुटी असतील तर त्या नक्कीच दर केल्या जातील, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. शासन आपल्या दारी उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रत्नागिरी येथील नाट्यगृहात आपण पुन्हा पाय ठेवणार नाही, असे सांगत प्रेक्षकांची जाहीर माफी मागणारे अभिनेते भरत जाधव यांच्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सावरकर नाट्यगृहात कोणत्या त्रुटी असतील तर त्या नक्कीच दूर केल्या जातील.

संयोजकांनी तीन तासांचे डिझेल टाकल्यानंतर ते चार तास पुरुच शकत नाही. कार्यक्रम किती वेळ चालवायचा हा संयोजकांचा विषय आहे. ज्यावेळेला आपण खातू नाट्यगृहात शो करत होतो, त्या वेळेला तुम्हाला कुठेही जायची तयारी होती, अशा स्वरूपाचा एका नाट्यरसिकाचा लेख आपण वाचला. आता वि. दा. सावरकर नाट्यगृहात अतिशय चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. भरत जाधव यांच्या नाटकाच्या आधी तीन दिवस मी त्याच ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांबरोबर कार्यक्रमासाठी होतो. त्यावेळेला एसीचा कोणताही त्रास आम्हाला झाला नाही. त्यामुळे आहे त्यापेक्षा उगाचच काहीतरी मोठे झाले आहे, असा आविर्भाव दाखवणं हे योग्य नाही, असे सामंत म्हणाले.

मी सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्ष काम करत आहे. आपण या सगळ्या लोकांना अनेक वर्ष बघत आहोत. भरत जाधव मला कॉल करून बोलू शकले असते. आठवड्याभरापूर्वी बेंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमात भरत जाधव माझ्यासोबत होते. त्यासाठी त्यांना असा इव्हेंट करण्याची आवश्यकता नव्हती. पण तो शेवटी त्यांचा प्रश्न आहे. परंतु या सगळ्याची दखल नक्की घेण्यात आली. काही त्रुटी असल्यास त्या नक्कीच दूर केल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. अभिनेता भरत जाधव यांनी माफी मागताना मला वाटलं त्यांनी प्रेक्षकांच्या तिकिटाचे काही पैसे परत दिले असतील, असा टोला पालकमंत्री सामंत यांनी लगावला.

RELATED ARTICLES

Most Popular