गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. वातावरणातील या बदलामुळे तापमानात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम आता पिकांवर होताना दिसत आहे. पाऊस नसल्याने पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून पाऊस आणखी लांबल्यास खरिपातील पिके संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. जुलै महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आजचे उत्पन्न केले आहे. पुराच्या पाण्याने शेती करून गेली होती. त्यानंतर शेतातील उभी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात बाधित क्षेत्राचे प्रमाण हळूहळू वाढत आहे.
अतिवृष्टीनंतर आता पावसाने मोठी उसंत घेतली आहे. परिणामी तापमानात वाढ झाली आहे. ऑगस्ट म हिन्यात काही दिवस पावसाचे वगळता उन्हाळ्यासारखे तापमान आहे. सप्टेंबर महिन्यातही तशी स्थिती दिसत आहे. दोन दिवसापासून उष्णता वाढलेली आहे. गेल्या काही दिवसापासून जमिनीतील ओलावा कमी होत आहे. त्यामुळे आता पिकांवर संकट येण्याची दाट शक्यता आहे. पाऊस नसल्याने भात पीक रोगामुळे फस्त होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. शेतकऱ्यांनी पीक वाचवण्यासाठी पंपाद्वारे पाणी लावून ओल करायला सुरुवात केली आहे. त्यातच आता कृषी वाहिनीवरील लोड वाढल्याने वीज पुरवठा ही खंडित होत आहे.
एकामागून एक संकट शेतकऱ्यावर येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरम्यान जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली, त्यानंतर पावसाने पाठ फिरवली आहे. ऑगस्ट महिन्यात काही ठराविक दिवसाच्या अंतराने पाऊस आला. मात्र जिल्ह्यात सर्वदूर पाऊस नव्हता. १५ ऑगस्ट नंतर पाऊस झाला नाही. सद्यस्थितीत पिकांना पावसाची फार गरज आहे. ओलिताची सोय असलेले शेतकरी ओलीत करीत आहेत. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांसम ओर पीक जगवण्याचा मोठा प्रश्न आहे. तापमानात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.