26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeRatnagiriगणपतीपुळेला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा बेस्ट रिसोर्ट ऑफ दि इयर पुरस्कार

गणपतीपुळेला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा बेस्ट रिसोर्ट ऑफ दि इयर पुरस्कार

देश आणि विदेशातील पर्यटकांची गणपतीपुळेला प्रथम पसंती असते.

धार्मिक पर्यटन स्थळाबरोबरच पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेल्या गणपतीपुळेला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ‘बेस्ट रिसोर्ट ऑफ दि इयर’ आणि ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’ पुरस्कारांनी गौरव केला आहे. गुहागर तालुक्यातील वेळणेश्‍वरलाही ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’चा पुरस्कार मिळाला आहे. कमी दिवसात जास्त रिलॅक्स होण्यासाठी कोकण हे महाराष्ट्रातील बेस्ट प्लेस असल्याचे पुन्हा समोर आले आहे.

कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी मुंबईत झालेल्या पर्यटन महामंडळाच्या आढावा बैठकीत हे जाहीर करण्यात आल्याची माहिती दिली. देश आणि विदेशातील पर्यटकांची गणपतीपुळेला प्रथम पसंती असते. गणपतीचे मंदिर आणि लागूनच असलेला विस्तृत समुद्र किनारा त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक गणपतीपुळे मध्ये दाखल होतात. पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गणपतीपुळे येथे विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याच प्रमाणे बोट क्लबसारख्या जलक्रीडा प्रकार देखील सुरू केले आहेत. तसेच वेडिंग, बर्थ डे डेस्टिनेशन म्हणूनही गणपतीपुळेत नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी एमटीडीसी प्रयत्नशील आहे.

२०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये एमटीडीसीला १ कोटी २० लाखांचा निव्वळ नफा मिळवून देणाऱ्या गणपतीपुळे रिसॉर्टला ‘रिसॉर्ट ऑफ दि इयर’चा गौरव मिळाला आहे. ‘सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे रिसॉर्ट’ तसेच इंटरनेटद्वारे देखील उत्तम सुविधा उपलब्ध करून देणारे येथील व्यवस्थापक वैभव पाटील यांचाही सन्मान तेंव्हा करण्यात येणार आहे. तर वेळणेश्‍वर, रायगड तालुक्यातील हरिहरेश्‍वर यांनाही बेस्ट ‘रिव्ह्यू ऑफ दि इयर’चा सन्मान मिळाला असून या रिसॉर्टचे व्यवस्थापक अनुक्रमे स्वप्निल पवार आणि सुभाष चव्हाण यांचाही सन्मान करण्यात आला आहे. कुणकेश्‍वर रिसॉर्टचे सिद्धेश चव्हाण यांना पदार्पणातच उत्तम काम केल्याबद्दल त्यांचाही सन्मान होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular