26.3 C
Ratnagiri
Tuesday, April 22, 2025

खराब तापमानामुळे सागरी मासेमारीवर परिणाम

सर्वसाधारणपणे गुढीपाडवा झाला की समुद्रात नव्याने मासळी...

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे...

रत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खेडशी...
HomeKhedलोटेमधील रासायनिक कंपनीतून वायूगळती, ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास

लोटेमधील रासायनिक कंपनीतून वायूगळती, ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास

ग्रामस्थ आंदोलन करतील आणि ते आंदोलन कारखान बंद होईपर्यंत चालू राहिल.

खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील रासायनीक कंपनीतून सोमवारी सायंकाळी सल्फर डाय ऑक्साईड नामक वायूची गळती झाली. त्यामुळे चाळकेवाडी व तलारेवाडी मधील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास झाला तसेच परिसरातील झाडेझुडपे, गवत व परसबागेतील भाजीपाला जळून नष्ट झाला अशी माहिती ग्रामस्थांनी पत्रकारांना दिली. वायू गळतीनंतर तलारेवाडी व चाळकेवाडी मधील ग्रामस्थ संतप्त झाले आणि सायंकाळी उशीरा ते कंपनीच्या प्रवेशद्वारावर धडकले. यावेळी लोटे गावचे सरपंच चंद्रकांत चाळके, चाळकेवाडीचे अध्यक्ष रोहित चाळके यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

या ग्रामस्थांनी कारखाना प्रशासनाला जाब विचारला असता व्यवस्थापनाकडून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे या वायूची गळती झाली असे सांगण्यात आल्याची माहिती सरपंच चंद्रकांत चाळके यांनी पत्रकारांना दिली. पुन्हा अशी दुर्घटना घडू नये यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ अशी ग्वाही कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात आली. मात्र या दोन्ही वाड्यांमधील ग्रामस्थांचे यावर समाधान झाले नाही. वारंवार अशा दुर्घटना या कारखान्यात होत असून या दुर्घटनांबाबत वारंवार ग्रामस्थांनी तक्रारी करून देखील गांभीर्याने घेतलेले नाही असा गावकऱ्यांचा दावा आहे.

हे प्रकार न थांबल्यास ग्रामस्थ आंदोलन करतील आणि ते आंदोलन कारखान बंद होईपर्यंत चालू राहिल असे सरपंच चंद्रकांत चाळके यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले आहे. दरम्यान या विषयी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता कोणतीही तक्रार दाखल नसल्याची माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली.

RELATED ARTICLES

Most Popular