25 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeRatnagiriपीडित मुलीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला, अत्याचार प्रकरण

पीडित मुलीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला, अत्याचार प्रकरण

दोन-तीन दिवसांत त्याचा अहवाल येण्याची शक्यता.

शहराजवळील चंपक मैदानावर तरुणीवर झालेले अत्याचार प्रकरण वेगळ्या वळणावर आहे. पोलिसांनी याची पूर्ण शहानिशा करून तांत्रिक पुराव्यानिशी ते उघड करण्याचा चंग बांधला आहे. त्या अनुषंगाने पीडित मुलीचे काही महत्त्वाचे नमुने (वेगळे स्वॅब), घटनास्थळावरील काही नमुने कोल्हापूर फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर चार दिवसांत पोलिस या प्रकरणाचा उलगडा करणार आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. घटनेनंतर जमावाने थेट पोलिसदलाला लक्ष्य केले.

हा प्रकार उघड झाल्यानंतर बदलापूरचे लोण रत्नागिरीत आले की काय, अशी शंका अनेकांच्या मनात उत्पन्न झाली होती. त्याचे पडसाद उमटत सर्व समाजाचे नागरिक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. पीडित मुलीला पाठबळ देत हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशी द्या, अशी मागणी होऊ लागली. पोलिसांनी वेळ न काढता मुलीने दिलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली. सीसीटीव्ही फुटेज मिळवले. तिने सांगितलेल्या जबाबानुसार, सर्व घटनाक्रमाची बारकाईने चाचपणी केली.

मोबाईल रेकॉर्ड तपासून तिच्या संपर्कात असलेल्या तरुणांची पोलिसांनी चौकशी केली; परंतु अजूनही नेमका प्रकार काय हे उघड झालेले नाही. या सर्व प्रकरणात पोलिस दल चांगलेच बदनाम झाले. पोलिसदलाचा वचक नसल्याचे बोलले गेले. पोलिसदलाला लागलेला हा डाग पुसण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी पीडित मुलीचे काही नमुने, घटनास्थळावरील नमुने तपासणीसाठी कोल्हापूर फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. दोन-तीन दिवसांत त्याचा अहवाल येण्याची शक्यता असल्याने चार दिवसांत उलगडा करू, असे स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular